महावाणी - विरेंद्र पुणेकर
राजुरा : बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा ( Adarsh High School Rajura ) येथे " सन्मान दिन " उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतच प्रभातफेरी काढून जयघोष करीत सन्मान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट मास्तर बादल बेले ( Scout Master Badal Belle ) यांची उपस्थिती होती. इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी सरिता गणेश लोहबळे व इयत्ता सहावी ची विद्यार्थ्यांनी संजना संतोष कवलकर यांनी सन्मान दिना विषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बादल बेले म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या पूर्वजांनी, समाज सुधारकांनी, क्रांतिकारक, देशभक्तांनी केलेल्या अनमोल अश्या कार्याना विसरत चाललो आहोत. असे न करता आपल्या उज्वल भविष्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन प्राणांची आहुती दिली अश्या महान क्रांतिकारक, समाजसुधारक, देशभक्तांच्या कार्याचे विस्मरण होऊ देऊ नये. वर्षाचा शेवटचा किंवा पहिला दिवस साजरा करण्यापेक्षा ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दिली, पुण्यातील भिडेवाडा येथे १ जानेवारी १८४८ रोजी भारतातील पहिली शाळा उघडली तो दिवस सन्मान दिन म्हणून आपण साजरा केला पाहिजेत. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव करीत शाळेतच मिरवणूक काढून या दिवसाचे महत्व विषद करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. ( mahawani ) ( rajura )