रामपुर येथे स्वाभिमान महिला ग्रामसंघाच्या वतिने सावित्रीबाई फुले जयंती उल्हासात साजरी

Mahawani


महिलांच्या हस्ते 50 लक्ष रू. च्या बचत गट भवनाचे भुमिपूजन संपन्न: ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे मानले आभार

महावाणी - विरेंद्र पुणेकर

०४ जानेवारी २४

राजुरा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत स्वाभिमान महिला ग्रामसंघ ग्रामपंचायत रामपूरच्या वतीने रामपूर येथिल माथरा रोड लगत वार्ड क्र. १ मधील ले-आऊट मध्ये (दि. ३) रोज बुधवारला सकाळी ११ वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  ( Krantijyoti Savitribai Phule ) जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदर्शन निमकर माजी आमदार राजुरा, प्रमुख उपस्थिती सुनिल उरकुडे ( Sunil Urkude ) माजी सभापती जिल्हा परीषद चंद्रपूर तथा भाजपा राजुरा तालुकाध्यक्ष, राहुल बानकर ( Rahul Banker ) उपसरपंच ग्रा.पं. रामपूर, ग्रा.पं. सदस्य अतुल खनके, लटारी रोगे, संगिता दुधे, गौरी सोनेकर, माया करलुके, माजी ग्रा.पं. सदस्य रमेश झाडे, स्वाभिमान महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष संध्या हरीहर, मार्गदर्शक सुमनताई बोबडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश फुटाने, मारोती जानवे, शंकर सोनेकर, वामन खंडाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी महिलांनी बचत गट भवनाचे भूमिपूजन केले. बचतगट महिलांनी मानले उपस्थित मान्यवरांचे आभार. ( mahawani ) ( rajura )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top