पाचगाव येथील कबड्डी स्पर्धेला खेडाळुंचा उत्स्फूर्थ प्रतिसाद !
१५ फेब्रुवारी २४
राजुरा/पाचगाव : आदर्श क्रीडा मंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा पाचगाव आयोजित बाळासाहेब कबड्डी चषक स्पर्धेचे उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून लाभलेले शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे (Babanbhau Urakude) हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पक्ष-पात बाजूला सारून आपल्या मदतीला सदैव कठीबद्ध राहून गावाच्या समस्यांसाठी जनतेच्या प्रेमातून व आपुलकीतून मिळालेल्या माझ्या पदाचा पुरेपूर वापर करत जनतेला न्याय देण्याचा क्षणो-क्षणी प्रयत्न करील अशी ग्वाही बबनभाऊ यांनी दिली. (Adarsh Sports Board, Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Branch Pachgaon)
तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ. आशाताई बबन उरकुडे ( Mrs. Ashatai Baban Urkude) सरपंच गोवरी, प्रवीणभाऊ अस्वले, कल्पनाताई काकडे ग्रा प सदस्य, मनोज कुरवटकर ग्रा. प सदस्य, विजयजी जाबोर, उद्धवजी चौधरी,दयाराम डोंगे, जंगा राय सिडाम,लक्ष्मणजी नुलावार,दशरथजी भोयर,कलाबाई इंदूरवार,बंडुजी कुरवटकर,गोविंदाजी काकडे,गजाननजी भेंडे, सुनिलजी वरारकार, प्रकाश कोहपरे, कविश्वर बोबडे, नानाजी विरदंडे, मनोहर बोबडे,दिनकर जिवतोडे,गजेंद्रजी पिदूरकर,मारोती जाबोर, अनिल भोयर, अरुण चिडे, प्रदीप खाडे, रवींद्र बोबडे,दत्ता पेंदोर, मानकु कुमरे, संतोष कोवे सर्व सदस्यगन आणि मोठ्या संख्येने गावकरी पुरुष महिला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन रुपेश पुलगमवार तर आभार प्रदर्शन मनोज जी कुरवटकर यांनी केले. (Balasaheb Kabaddi Cup 2024 grand opening) (mahawani) (rajura) (chandrapur) (shivsena)