आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३ - २४ अंतर्गत मुठरा ते खामोना पांदण रस्त्याचे बांधकाम
२२ फेब्रुवारी २४
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा मुठरा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक चंद्रपूर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३ - २०२४ अंतर्गत मुठरा ते खामोना पांदण रस्त्याचे बांधकाम करणे, नाल्याला संरक्षण भिंत बांधणे, स्मशानभूमी शेड चे बांधकाम करणे अंदाजे किंमत २४ लक्ष, मौजा कुकुडसाथ येथे रस्त्याचे मजबुतीकरण करणे, अंदाजे किंमत २० लक्ष (20 Lakh) रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांच्या हस्ते आणि राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. (Chandrapur MLA Local Development Program 2023 - 2024)
या प्रसंगी मुठरा येथे सरपंच करिश्मा बोबडे, उपसरपंच विश्रांती करमनकर, ग्रा. प. सदस्य ऋतूराज करमनकर, वर्षा ताकसांडे, शिवाजी बोबडे, किशोर पुणेकर, जितेंद्र जीवने रतन लांडे, प्रकाश जीवने, शांता दुर्गे, शिवाजी आगलावे, स्वप्निल देठे, सुनीता आवडे, नंदलाल निरांजने, रामदास जीवने, आबाजी बोबडे, शेख सर, अश्विनी जेनेकर, अंकुश कांबळे, मुरलीधर आत्राम, लक्ष्मण घुगुल, बया घोटेकर, कुकडसाथ येथे सरपंच शंकर आत्राम, ग्रा. प. सदस्य जयश्री गोरे, मिनाबाई आत्राम, वासुदेव बोधे, देवाजी आत्राम, अभिषेक गोरे, रमेश वडस्कर, भाऊराव सोयाम, राजेंद्र लोनगाडगे, हेराम लोनगाडगे, भाऊराव मुठ्ठलकर, पवन निमकर, जितेंद्र टेकाम, लक्ष्मण आत्राम, दादाजी मडावी, अनिस डोंगे, अरुण चहारे, धर्मराज ताजणे, सविता टेकाम, जयश्री वांढरे, स्वप्नील लाकडे, सुमित लोनगाडगे, शंकर खामनकर, उत्तम मुठ्ठलकर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.