गडचांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण : विविध कार्यक्रमांचे आयोजन.
२० फेब्रुवारी २४
कोरपना : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती, गडचांदूर द्वारा करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर येथे शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांना प्रेरणादायी ठरेल असा अश्वरुढ पुतळा असावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी लक्षात घेऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने हे स्वप्न साकार झाले. दिमाखदार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाचे उद्घाटक आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रमुख अतिथी आमदार सुधाकर अडबाले, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा सविताताई टेकाम, शिवसेना उबाठा चे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती, धर्मीयांना न्याय देणारे, बहुजन हिताय बहुजन सुखाय असे स्वराज्य निर्माण करणारे राजे होते. बुद्धी चातुर्य, अपराजेय युद्ध कौशल्य, अभेद्य गडकिल्ले बांधकाम कौशल्य, राजनीती कौशल्य, अदभूत साहस, संयम, अचूक निर्णय शक्ती, न्याय, निती, महिला, शेतकऱ्यांचा सन्मान अशी अनेक गुणवैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात, नव्या पिढीने ते आत्मसात करून प्रगती करावी असे आवाहन केले. (Chhatrapati Shivarai is a king who gives justice to all castes, religious people: MLA Subhash Dhote.)
यानिमीत्त शहरात सकाळी ९ वाजता मोटारसायकल रॅली, १० वाजता रक्तदान शिबीर, सायं ५ वाजता साई मंदिर येथून ढोलपथक व शिवकालीन पारंपारीक वेषभूषेतील कलावंतांसह भव्य शोभयात्रा, लेजर शो, आतिषबाजी, संभाजीनगर येथील प्रख्यात शिवव्याख्याते सहयाद्री युवारत्न पुरस्कार प्राप्त तुफानी वक्ते संदीपजी औताडे पाटील यांचे शिवव्याख्यान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक ढोलपथक, छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, वीर संभाजी महाराज, वीर मावळे यांच्या भूमिकेतील बालगोपाल, विविध देखावे, आतिषबाजी, लेजर शो सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या संपूर्ण सोहळाला जेष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, शिवकुमार राठी, नामदेवराव येरणे, रउफ खान, शरद जोगी, नगरसेवक विक्रम येरणे, राहुल उमरे, अरविंद मेश्राम, सागर ठाकूरवार, शेख सरवर, कल्पनाताई निमजे, अर्चना वांढरे, किरण अहितकर, वैशाली गोरे, अश्विनी कांबळे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती गडचांदूर चे अध्यक्ष सचिन भोयर, सदस्य मनोज भोजेकर, रोहित शिंगाडे, किशोर बोबडे, प्रणित अहिरकर, रोहन काकडे, पवन राजुरकर, अतुल गोरे, मयूर एकरे, वैभव राव, संजय रणदिवे, काँग्रेस, राष्ट्रवादी(श. प), शिवसेना (Shiv Sena) (उ. बा. ठा.) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महात्मा गांधी महाविद्याल, विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, यासह ५ हजार च्या वर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष सचिन भोयर यांनी केले, सुत्रसंचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष संतोष महाडोळे यांनी केले. (rajura) (mahawani)