बीएससी नर्सिंग, जी.एन.एम. नर्सिंग आणि ए.एन.एम.च्या तिसऱ्या बॅचसाठी शपथविधी !
०७ फेब्रुवारी २४
राजुरा : इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने बीएससी नर्सिंग, जी.एन.एम. नर्सिंग आणि ए.एन.एम.च्या तिसऱ्या बॅचसाठी शपथविधी आणि दिपप्रज्वलन समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास डाकोरे यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन ही आधुनिक काळातील नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना श्रद्धांजली होती आणि प्रतिज्ञा होती. (B.Sc Nursing, G.N.M. Nursing) (Medical Superintendent Dr. Vikas Dakore)
यावेळी उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. डाकोरे (Medical Superintendent Dr. Dakore) आणि श्रीमती सरला ढोमणे (sarla thomne) मेट्रोन यांनी नर्सिंग विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट व्यवसायाचा उच्च दर्जा राखण्यासाठी आणि परिपक्वता, सहानुभूती, समर्पण आणि बांधिलकीची भावना विकसित करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सुचवले की प्रत्येक विद्यार्थ्याने नवीनतम तांत्रिक प्रगती आणि वैद्यकीय क्षेत्राबद्दलचे वैज्ञानिक ज्ञान अवगत ठेवावे. दिपप्रज्वलन सोहळ्यातून विद्यार्थ्याने आजारी व्यक्तींची काळजी घेण्यासाठी संकल्पबध्द व्हावे. तर प्राचार्य संतोष शिंदे यांनी आपल्या भाषणात, यशस्वी परिचारिका बनण्यासाठी आवश्यक असलेले समर्पण, वचनबद्धता आणि आवड यावर लक्ष केंद्रित करून परिश्रम घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या प्रसंगी कल्याण काॅलेज आँफ नर्सिंगचे प्राचार्य संतोष शिंदे, इन्फंटच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अंसारी यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (Santosh Shinde, Principal, College of Nursing) (Organized oath taking and lamp lighting ceremony for students of Kalyan College of Nursing.) (mahawani) (rajura)