बल्लारपुर शहरात "वाळू विक्री" कायदेशीर की बेकायदेशीर ? -रविकुमार पूप्पलवार

Mahawani


घराचं बांधकाम करणारे मालक आणि बांधकाम कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने त्रस्त आहेत.

महावाणी - विरेंद्र पुणेकर 
०२ फेब्रुवारी २४

बल्लारपुर : आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांचे अधिकाऱ्यांपुढे सवाल उपस्थित केला आहे कि, तीन-चार महिन्या पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी मुबलक प्रमाणात वाळू मिळत नाही आहे, अनेक नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसून येत आहे. घराचं बांधकाम करणारे मालक आणि बांधकाम कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने त्रस्त आहेत. गावात कायदेशीर वाळू उपलब्ध नसून अवैध वाळू मात्र मुबलक प्रमाणात मुबलक दरात उपलब्ध कशी होत आहे ? असा प्रश्न देखील पुप्पलवार यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. (Ravi Bhau Puppalwar) 

शहरात आजकाल एक टाटा एस भरून अवैध वाळू तीन ते चार हजाराच्या दरात विक्री केली जात आहे. बल्लारपूर शहरातील जनते समोर "मरता क्या ना करता" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी बल्लारपूर शहरातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. बांधकामासाठी जनतेला कायदेशीर वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद कोण करणार याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? शहरात अवैध वाळू विक्रीला कोण प्रोत्साहन देत आहे ? शहरात अवैध वाळू कुठून येत आहे ? कोणाद्वारे याचा पुरवठा केला जात आहे. याची अधिकाऱ्यांना कल्पना नाही का ? आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न पडतो आहे. अशाप्रकारे शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील रेती समस्येबाबत आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. (mahawani) (ballarpur) (Is "sand selling" legal or illegal in Ballarpur city ?) 

  • संबंधित वाळू विक्रेत्यांची चौकशी करून त्वरित कारवाई करू -अजय नवकरकर, तलाठी, बल्लारपूर साजा (Ajay Navkarkar)

To Top