बादल बेले उत्कृष्ट शिबीर नियोजक म्ह्णून सन्मानित.

Mahawani


स्काऊट-गाईड च्या राजुरा येथील जिल्हा मेळाव्याच्या आयोजनाची घेतली दखल.

प्रामाणिक परिश्रमाला सहकार्याची जोड मिळाल्यास यश संपादन होईलच. -आमदार सुधाकर अडबाले

महावाणी - विरेंद्र पुणेकर
2  फेब्रुवारी 24

राजुरा : दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०२० या कालावधीत राजुरा येथे संपन्न झालेल्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल उत्कृष्ट शिबीर नियोजक म्हणून बादल बेले यांचा नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने पद्ममापुर येथे तीन दिवशीय स्काऊट गाईड जिल्हामेळावा नुकताच संपन्न झाला. समारोपीय कार्यक्रमाला आमदार सुधाकर अडबाले यांच्या सह स्काऊट गाईड चे माजी जिल्हा मुख्य आयुक्त लक्ष्मणराव धोबे, सामाजिक कार्यकर्ते मारोतराव मत्ते, बहुजन हिताय फाउंडेशन चे अध्यक्ष दिलीप वावरे, प्राचार्य सूर्यकांत खणके, मेळावा प्रमुख किशोर उईके, कार्यक्रम प्रमुख शांताराम उईके, जिल्हा संघटक स्काऊट चंद्रकांत भगत, सहाय्यक मेळावा प्रमुख स्काऊट यशवंत हजारे, गाईड रंजना किनाके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राजुरा येथे झालेल्या मेळ्याव्यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शाळांचे स्काऊट गाईड विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. अनेक प्रकारच्या स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे पोलीस विभागाचे शस्त्रास्त्र व डॉग स्कॉट यांचे प्रात्यक्षिक लक्षवेधी ठरले होते. या संपूर्ण नियोजनाची दखल घेऊन बादल बेले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अडबाले यांनी बादल बेले यांच्या कार्याचे कौतुक करीत प्रामाणिक प्रयत्न करीत असताना सहकार्याची योग्य जोड मिळाल्यास आपल्याला यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन केले. स्काऊट गाईड, शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रात कार्यरत बेले यांचा सत्कार करणे हे आम्हचे कर्तव्य असल्याचे मत कार्यक्रम प्रमुख शांताराम उईके, मेळावा प्रमुख किशोर उईके ,सहाय्यक मेळावा प्रमुख स्काऊट यशवंत हजारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेळावा प्रमुख किशोर उईके यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम प्रमुख शांताराम उईके यांनी केले. तर आभार जिल्हा संघटक स्काऊट चंद्रकांत भगत यांनी मानले. 

 यावेळी स्काऊट गाईडचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शिक्षण विभागाचे अधिकारी यांचीही उपस्थिती होती. बादल बेले यांच्या सत्काराबद्दल मेळावा आयोजन समितीचे सुरेखा बोमनवार, नागेश सुखदेवे, अनु खानझोडे, प्रमोद बाभळीकर, प्रशांत खुसपुरे, कैलाश भसाक्षेत्रे,  पी. एम. जाधव, के, एस, मनगटे, आत्माराम गौरकर,नरेंद्र पाटील, किशोर कणकाटे, राजू बलकी, उमाजी कोडापे, अल्का खापणे, अल्का ठाकरे, मंजुषा घाईत, किशोर नरुले, सुदर्शन बारापत्रे, मिथुन किन्नके, संदीप वदेलवार,मंगेश श्रीरामे, सीमा वंदिले, विजू वैद्य आदींनी अभिनंदन केले. (rajura) (badal bele) (Mahawani) (If honest hard work is coupled with cooperation then success will be achieved. - MLA Sudhakar Adbale)

To Top