शिबिराला मोठ्या प्रमाणात उपासक, उपसिकांनी आपला सहभाग दर्शवत केले धम्म प्रशिक्षण आत्मसात.
२७ फेब्रुवारी २४
राजुरा/रामपूर : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर (पश्चिम विभाग) अंतर्गत तालुका शाखा राजुरा च्या वतीने दि. 16 ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत "डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय" रामपूर ता. राजुरा येथे धम्म उपासक, उपासिका प्रशिक्षण शिबीर समता महिला मंडळ रामपूर तर्फे आयोजन करण्यात करण्यात आले होते. 25 फरवारी 2024 रोज रविवार शिबीराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
शिबिरामध्ये सर्व प्रथम महाकारूनि तथागत सिद्धार्थ गौतम बुध्द, विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाध्यक्ष आयु. इजी. नेताजी भरणे यांच्या हस्ते दीप प्राजलीत करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपासक, उपसिकांनी सहभाग दर्शवत धम्म प्रशिक्षण आत्मसात केले. तसेच सदर शिबिरात आयुष्यमती. मेघाताई बोरकर, कमल टेकाडे, किशोर तेलतुंबडे, गायत्रीताई रामटेके शहर अध्यक्षा, सपनाताई कुंभारे केंद्रीय शिक्षिका यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. मुरलीधर ताकसांडे समता बौध्द समाज मंडळ रामपूर, शिबिराचे अध्यक्ष तथा भा. बौ. म राजुरा तालुका अध्यक्ष आयु. धर्मुजी नगराळे साहेब उपस्थित होते.
तसेच प्रमुख उपस्थिती आयु. अशोक दुबे ग्राम अध्यक्ष, गौतम चौरे, भिमराव खोब्रागडे, गौतम देवगडे, सुजाताताई लाटकर जिल्हा उपाध्यक्ष, महिला विभाग केंद्रीय शिक्षिका, समताताई लभाने, पंचशीला वेल्हे, आद.कविताताई अलोने, आद. गायत्रीताई रामटेके शहर अध्यक्षा आणि सुजाता नळे केंद्रीय शिक्षिका हे होते. सर्व उपस्थित मंडळींनी शिबीरात मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आयु. नी. सोनिया अबांदे संचालन आद. अशोक मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. नी. रंजनाताई ताकसांडे यांनी केले.
प्रारंभी प्रशिक्षणार्थी बहुसंख्य महिलांनी दहा दिवसीय शिबिरातुन मिळालेले शिक्षना बाबत आद. संतोष कांबळे, सरलाताई फुलझेले, उज्वलाताई नले, वनिता मून, पौर्णिमा रामटेके, वंदना देवगडे, उर्मिला जनबंधू, विशेषता ओबीसी महिला श्रीमती. गीता लोहे यांनी आपले सुंदर मनोगत व्यक्त केले.
शिबिरातील दहा दिवस सर्वच विषयांवर आद. उषाताई आणि प्रगतीताई यांनी उत्तम रित्या शिकविल्याची माहिती दिली. त्याबद्दल सर्वांनी उषाताई आणि प्रगतीताई चे अभिनंदन केले. विशेष म्हणजे प्रगतीताई ने नृत्य, वेशभुषा आणि खेडी मेडीचे वातावरण तयार करून सगळ्याचे मनोरंजन केले. भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका च्या वतीने सर्वच प्रशिक्षणार्थी महिलांना उपासक, उपासिकाना प्रमाणपत्र वितरित करत पदाधिकारी आद. मुरलीधर ताकसांडे, किशोर तेलतुंबडे, धर्मुजी नगराळे, सुजाता लाटकर, प्रगती मेश्राम, उषा तामगडे व समता लभाने यांना सन्मान चिन्ह देत गोैरवित पदाधिकारी या शिबिराला दहदिवासीय प्रशिक्षण देणाऱ्या आयु. नि. उषाताई तामागडे आणि प्रगतीताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर यांचे उपासक, उपासीकांनी पुष्पगुच्छ देत आभारस्पद सत्कार करण्यात आला तसेच उपस्थितां करिता समता बौध्द मंडळ, समता महिला मंडळ रामपूर यांनी उपहाराची उत्तम व्यवस्था केली होती सर्वानी उपहाराचा आस्वाद घेतला व सरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (mahawani) (rampur) (rajura) (Buddhist Mahasabha of India) #mahawani