टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने जांबूळधरा येथे क्लस्टर स्तरीय वन हक्क कार्यशाळेचे आयोजन !

Mahawani


जांबुळधरा पर्यटन विकास व इत्यादी महत्वाच्या विषयावर चर्चा संपन्न !

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२९ फेब्रुवारी २४

कोरपना/जांबूळधरा : २७ फेब्रुवारी रोजी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अन्वये कोरपना तालुक्यातील १३ गावांना सामूहिक वन हक्क प्राप्त झाले असून टाटा सामाजिक विज्ञान संस्था गेल्या दोन वर्षापासून या गावामध्ये प्रकल्पा अंतर्गत कार्य करीत आहे. या गावामध्ये वन हक्क प्राप्त झाल्यानंतर समिती गठीत करणे, बँक खाते उघडणे, समिती पदाधिकारी चे प्रशिक्षण घेणे, आराखडा तयार करण्यात ग्रामसभांना मदत करणे, रोहयो यंत्रणा घोषित करणे, यशस्वी ग्रामसभांना गाव भेटी इ उपक्रम यशस्वी पणे राबविले जात आहे. #Tata Institute of Social Sciences

    सदर कार्य आणखी वेगाने पुढे जाण्याच्या दृष्टीने सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा जांबूळधरा ग्रामपंचायत मांडवा येथे घेण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत वन हक्क कायदा २००६ ग्रामसभेचे अधिकार आणि कर्तव्य, सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीची कार्यें, जांबूळधरा ला सामूहिक वन हक्क क्षेत्रात कलम ३.२ अंतर्गत समाज भवन बांधकाम, तेंदू पत्ता विक्री साठी ग्रामसभा महासंघ स्थापन करून कार्यकारणी गठीत करणे, वन क्षेत्राचे सीमांकन करणे, ५% अबंध निधीतुन वृक्षारोपण आणि वन संवर्धन कार्यासाठी सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीला निधी मिळण्याबाबत पत्र व्यवहार करणे, रोहयो यंत्रणा प्रस्ताव सादर करणे, रेकॉर्ड हाताळणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे, जंगल संरक्षण साठी नियमावली तयार करणे,  जांबुळधरा पर्यटन विकास करणे इ. महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली व चर्चेत ग्रामसभांनी समोर अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प मांडला. #Jagdish Dolsakar #Ambuja Foundation

  सदर कार्यशाळेला पीपर्डा, पार्डी, अकोला, टांगाळा, जांबूळधरा, येरगव्हाण, मांगलहिरा, उमरहिरा, सावलहिरा, थिप्पा, शिवापूर, बेलगाव, हातलोनी या गावातील पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. टाटा सामाजिक विज्ञान संस्थान चे अमोल कुकडे (Amol Kukde), जगदीश डोळसकर, प्रवेश सुटे, FES या संस्थेच्या प्रतिनिधी सुषमा पोटे, वनरक्षक, अंबुजा फॉउंडेशन चे प्रतिनिधी सुलभा सिडाम व इतर, तालुका कन्व्हर्जेन्स समिती मूल चे सदस्य वासुदेवराव कुळमेथे, ग्रामसेवक, सरपंच, वॉर्ड मेंबर इ. हजर होते. #Tata Institute of Social Sciences #mahawani #korpana #jambuldhara

To Top