चंद्रपुर शिवसेना भारतीय कामगार संघटनेचा विस्तार !

Mahawani

 

शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या चंद्रपुर कामगार जिल्हाध्यक्षपदी संतोष पारखी यांची तर वाहतुक जिल्हाध्यक्षपदी अरविंद धिमान यांची नियुक्ती !

महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ फेब्रुवारी २४

चंद्रपुर : वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांच्या हस्ते शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष  मा. श्री. संतोष दशरथ पारखी यांची कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख अरविंद धिमान यांची वाहतुक संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति करुन दोन्ही जिल्हाध्यक्ष मिळून वाहतुक व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांनी निर्देश देवून नियुक्तीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. (Maharashtra President of Workers' Union Shri. Laxmanbhai Janardhan Tandel)

सदर नियुक्तीने संतोषभाऊ पारखी तसेच अरविंद धीमान यांच्या समर्थकता कमालीचा उत्साह दिसून येत आहे कामगारांच्या समस्या व वाहतूक विभागातील अडचणी आज योग्य हाताने मार्गी लागेल असे समर्थकांतून बोलले जात आहे. 


  • मागील काळात आमच्या व सहकारी कामगारांच्या आणि वाहतूक विभागात होत असलेल्या असंख्य समस्या मांडण्या करीत योग्य व्यासपीठ नव्हते परंतु आज संतोष भाऊ आणि अरविंद धिमानजी यांच्या स्वरुपात हक्काचा माणूस आम्हाला मिळाल्याने आमच्या समस्या नक्की मार्गी लागेल असा आमचा विश्वास आहे. समर्थक, कामगार, चंद्रपूर 
(Chandrapur Shiv Sena Indian Trade Union) (mahawani) (santosh parkhi) (arvind dhiman)

To Top