शिव जन्मोत्सव घरात साजरा करून चिमुकल्यांना उपहार वितरन
राजुरा : 1869 साली राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले (Mahatma Jyotiba Phule) रायगडावर गेले, त्यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला आणि त्या समाधीला पुष्पमाला अर्पण करुन वंदन केले व शिवजयंती उत्सवाला महात्मा फुलेंनी सुरुवात केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री. शिवाजी महाराज (Chhatrapati Shri. Shivaji Maharaj) यांची जयंती आज मोठ्या उत्साहात जगभरात साजरी केली जाते. चौका-चौकात शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करुन ढोल-ताशे व डी.जे. च्या गजरात मिरवणुकाही काढल्या जाते. परंतु घरगुती शिवरायांची जयंती साजरी होतांना क्वचितच आढळते.
अशीच एक शिव जयंती राजुरा ( rajura) तालुक्यात धोपटाळा (dhoptala) येथे साजरी करण्यात आली. कु. ओजस्वी व चि. रेहांश हे 5 व 6 वर्षांचे चिमुकले, लहानपणापासुनच त्यांचे आई-वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत महती देत असायचे व प्रत्येक जन्मोत्सवात सहभागी व्हायचे. आता मुले सुधन झाल्याने या वर्षी आई-वडीलांसमोर एक संकल्पना मांडली की, आपणही जसा गणेश उत्सव साजरा करतो तसाच आपल्या घरी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करु. आपल्या घरी झेंडा लावु आणि तोरणे बांधु आई-वडिलांनी मुलांच्या या विचाराचे स्वागत करत त्यांच्या संकल्पनेला दुजोरा दिला.
राजुरातील व्यवसायीक ग्लोबल ग्राफिक्सचे संचालक श्री. गजानन तपासे व त्यांची अर्धांगिनी सौ. राजश्री गजानन तपासे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आणि आपल्या चिमुकल्यांसोबत छत्रपतींचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आपल्या घरी साजरा केला. (Director of Global Graphics Mr. Gajanan tapase)
सकाळीच दारासमोर शेणपाण्याचा सडा टाकुन, दारावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधली, अंगणात भगवा पताका व घरावर भगवा झेंडा लावला कु. ओजस्वी व चि. रेहांश यांनी आपल्या वार्डातील मित्र - मैत्रिणींना घरोघरी जावुन शिवजन्मोत्सवाचे आमंत्रण दिलं.
सगळे चिमुकली मित्र मंडळी एकत्रित आपल्यानंतर सर्वप्रथम शिवरायांच्या मुर्तीला पुष्पामाला अर्पण करुन शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. तंतपश्चत मुलांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शिवरायांबद्दल थोडक्यात माहीती देवुन मुलांचे नृत्य घेवुन मुलांचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला व शेवटी मुलांना उपहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माँसाहेब जिजाऊंच्या भुमिकेत कु. ओजस्वी गजानन तपासे व कु. माही सुरज पिंपळशेंडे तर शिवरायांच्या भुमीकेत चि. रेहांश चंद्रकांत तपासे ही चिमुकले सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. चंद्रकांत तपासे, सौ. प्रिती तपासे, सौ. पुजा सुरज पिंपळशेंडे यांनी मौलाचे कार्य केले.
- भविष्यात प्रत्येक घरोघरी सर्व थोर महापुर्षांयांच्या जयंत्या अशाच प्रकारे साजरे व्हावे अशी आशा आयोजकांनी बाळगली आहे आणि समोरील महापुर्षांयांच्या जयंत्या अश्याच उल्ल्हासात घरी साजऱ्या करणार -श्री. चंद्रकांत तपासे, सौ. प्रिती तपासे, सौ. पुजा सुरज पिंपळशें