विविध मागण्या समेत स्थानिक बेरोजगारांना रोजगारा मिळवून देण्या करीता मोर्च्याचे आयोजन : असंख्य लोकांचा सहभाग !
राजुरा/बाबापुर : महा मिनरल मायनिंग & बेनिफिशिअर प्रायव्हेट लिमिटेड (गुप्ता कोल वाशरी) नुकतीच कामाला सुरवात करत आहे. सदर कंपनी गोवरी ग्रामपंचायत हद्दीत येत असून सदर कंपनीवर मागील १० ते १२ वर्षाचे गोवरी ग्रामपंचायतीचे कर बाकी आहे. गुप्ता कोल वाशरी चे महा मिनरल मायनिंग & बेनिफिशिअर प्रायव्हेट लिमिटेड (MMM & BPL) ह्या नावात रूपांतर झाले असून सदर कंपनी गोवरी, बाबापुर, मानोली (बु.) क्षेत्रात सुरु होत आहे.
सदर कंपनीत स्थानिक बेरोजगारांना कंपनीत रोजगार, ग्रामपंचायतीचे थकबाकी असलेले कर तात्काळ भरणा करणे, परिसरातील धुळीने झालेल्या शेत पिकाची नुकसान भरपाई देणे इत्यादी मागण्या घेत आज ०२ मार्च रोजी ११ वाजता एल्गार मोर्चा मा. शिवसेना (उ. बा. ठा ) जिल्हाप्रमुख श्री. संदीप गिऱ्हे, मा. उपजिल्हा प्रमुख श्री. बबनभाऊ उरकुडे, मा. राजुरा तालुका प्रमुख श्री. संदीपभाऊ वैरागडे यांच्या नेत्तृत्वात हजारोच्या संख्येने सदर मोर्चा काढण्यात आला विशेष मोर्चात गोंडी नृत्य सादरीकरण डपला वाद्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. (MAHA MINERAL MINING & BENEFICIARY PRIVATE LIMITED)
मोर्चात मोठ्या संख्येने स्थानिक युवक, महिला, पुरुषांनी सहभागफ घेतला होता सदर मोर्चा गोवारी कॉलोनी येथून सुरु होऊन कंपनीच्या मार्गाने पायदळ महा मिनरल मायनिंग & बेनिफिशिअर प्रायव्हेट लिमिटेड येथे धडकला उपस्थित मान्यवराने आपले मनोगत व कंपनी संधर्भात आपली भूमिका व्यक्त केली या शनी शिवसेना नेते बबनबाऊ बोलत होते जो परियंत रोजगाराचा प्रश्न सुटत नाही तो परियंत गोवरी ग्रामपंचायत मार्फत कुठलेही नाहरकत प्रमाणपत्र सदर कंपनीला देणार नाही.
कंपनी जो परियंत आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही तो परियंत कंपनीला काम सुरु करू देणार नाही आणि कंपनीचे कुठलेही वाहन मार्गाने जाऊ देणार नाही. आज आपण शांत पद्धतीने हा मोर्चा काढला जर मागण्या मान्य न झाल्यास केव्हा तफावत आढळून आल्यास शिवसेना पद्धतीत मोर्चा काढू, स्थानिक युवकांना स्थानिक कंपनीत रोजगार हा त्यांचा अधिकार आहे. असे शिवसेना (उ. बा. ठा) चंद्रपूर जिल्हा प्रमुख ह्या प्रसंगी व्यासपीठावरून बोलत होते.
महा मिनरल मायनिंग & बेनिफिशिअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला शांत स्वरूपी निवेदनाद्वारे सदर मागण्या देण्यात आल्या कंपनीचे सिनियर वाईस प्रेसिडेंट (HR &Admin) श्री. मोहन रुघानी हे ह्या शनी उपस्थित होते त्यांनी सध्या ७५ रोजगार देण्याचे मान्य केले येत्या १ एप्रिल परियंत सदर ७५ जागा स्थानिकांना घेत भरल्या जाईल व समोरील काळात पुन्हा मनुष्य बळा नुसार रोजगारात वाड करू असे अश्वसन दिले. (Mr. Mohan Rughani)
सदर मोर्चा शांततेत यसास्वी झाला असे मा. बबनभाऊ उरकुडे यांनी जाहीर केले व सर्व उपस्थित जनतेला अल्प उपहार देत मोर्च्याची सांगता झाली. या प्रसंगीशिवसेना तालुका संघटक बबलू खुशवा, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवा सेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, पत्रकार प्रकाश काळे, पत्रकार तथा सदस्य ग्रा. पं मानोली (बु.) विर पुणेकर (Veer Punekar), नरसिंग मादर, मनोज कुरवटकर, गोवरी येथील सरपंच आशा उरकुडे, रामपूर सरपंच निकिता झाडे, अमोल कोसुरकर, उपसरपंच ग्रा. पं मानोली (बु.) सत्यशीला वरारकर, बाळू कुइटे, सूरज नक्कावार, व गोवरी, बाबापुर, मानोली(बु.), अहेरी पाचगाव, सोंडो, कढोली (बु.) परिसरातील बेरोजगार युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. #Babanbhauurakude #Sandeepgirhe #rajura #mahawani
बघा व्हिडिओ