स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पो.स्टे. विरूर ची संयुक्त कार्यवाही
१८ मार्च २०२४
विरूर : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रिय झाला असन मा. श्री. मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan), पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. रिना जनबंधू (Rina Janbandhu), अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदशीखाली अवैदय दारू निर्मिती वाहतूक व विक्रीरवर आळा घालण्याकरीत चंद्रपूर पोलीसांनी धडक मोहिम हाती घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या तोंडावर जिल्हात मोठया प्रमाणत हातभट्टी तसेच अवैदय मद्य निर्मिती वाहतूक आणि विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाहि. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार (Mahesh Kondawar) यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापण करण्यात आले असून सदर पथकाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात अवैदयरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू असून जिल्हयात ठिकठिकाणी तयार होणारी हातभट्टी व परराज्यातून वाहतूक होणारी अवैद्य दारू यावर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष लक्ष केले आहे.
आज १८ मार्च रोजी सकाळचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती नुसार पो.स्टे. विरूर अंर्तगत मौजा थोमापुर (Thomapur) येथे काहि इसम व मौजा मुडीगेट (mundiget) येथे एक . इसम हातभट्टी लावून अवैद्यरित्या दारू गाळीत आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पो.स्टे. विरूर यांचे पथकासह रवाना होवून मौजा थोमापूर येथे पोहचून शोध घेतला असता दोन घराचें परिसरात हातभट्टी दारू सडवा व हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३१,२००/- रू. चा माल मिळून आला. तर मौजा मुडीगेट येथील एका महिलेच्या घरा मागे कायदेशिररीत्या झडती घेतली असता सदर घटनास्थळावर हातभट्टी दारू सडवा व हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २७, २००/- रू. चा माल मिळून आला. सदरचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला असून गून्हयातील फरार आरोपी नामे १) रवि भदु सभावत (Ravi Bhadu Sabhawat), रा. थोमापूर ता. राजुरा, २) किसन बिच्चा घुगलोत (Kisan Biccha Ghuglot), थोमापुर ता. राजुरा ३) कविता मालोत (Kavita Malot), रा. मुडीगेट ता. राजुरा यांचे विरूध्द पो.स्टे. विरूर येथे कलम ३२८ भादवी सहकलम ६५ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनी हर्षल ऐकरे, सपोनि मनोज गदादे, सपोनि संतोष वाकडे, पोहवा नितिन साळवे, सुभाष गोहोकार, अनूप डांगे, नितेश महात्मे, पोशि प्रसाद धुलगुंडे, मिलिंद जांभुळे, चालक पोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच पोहवा सुभाष कुळमेथे, मलया नलगेवार, पो.शि. सचिन थेरे, गजानन चारोळे, लक्ष्मीकांत खंडाळे, प्रमोद मिलमिले, राहूल वैद्य, मपोशि प्रियंका राठोड, मंगला मेश्राम सर्व पो.स्टे. विरूर यांनी केली. (mahawani) (rajura) (virur police) (LCB) (chandrapur)