राजुरा शेत्रात हॉटेल व्यावसाईकावर प्राणघात हल्ला !
०१ मार्च २४
राजुरा : मागील महिन्यात चंद्रपूर, गोंडपिपरी, बल्लारपूर, जिवती, शेत्रात हत्येच्या सत्राने चंद्रपूर जिल्हा हादरला होता. त्यात राजुरा शेत्रात हॉटेल व्यावसाईकावर प्राणघात हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्याने राजुरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.
वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्यावर आळा घालण्या करीता जय भवानी कामगार संघटना, चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष तथा आम आदमी पार्टी नेते मा. श्री. सुरज ठाकरे यांनी मा. पालक मंत्री चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर व संबंधित विभागांना निवेदन देत राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी कोळशाचे अवैध्य टाल असल्याचे गेल्या ४ वर्षांपेक्षा अधिक कालावधी पासून याबाबत वारंवार निवेदन दिले परंतु पोलीस प्रशासनाच्या सौम्य कारभारामुळे आज शांतता प्रिय असलेल्या राजुरा तहसील मध्ये गोळीबाराच्या दोन घटना घडल्या ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तसेच अवैध धंध्यानमधून कमाविलेल्या रकमेतून गुंडांचे बळ आणखीन वाढले आहे.
राजुरा ते गडचांदूर मार्गावर कापणगाव नजीक दिवसाढवळ्या अवैध्य कोळसा तस्करी चे काम सर्रास सुरू असून याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. वरिष्ठ अधिकारी सदर मार्गाने ये-जा करत असून देखील याकळे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
अनेकदा सदर विषयाबाबत तक्रारी दिल्या, पुरावे देखील सादर केले परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने जीवघेना हल्ला होऊन देखील हल्लेखोर मोकाट फिरत आहेत. पोलीस प्रशासन, कायदा व सुव्यवस्थेची चेष्ठा हे गुंड प्रवृत्तीचे लोक उडवताना दिसतात.
भविष्यातील निवडणुका पाहता राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये काही अनिष्ट घडू नये याकरिता अवैध व्यवसायात गुंतलेल्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांवर कठोर कार्यवाही करावी तसेच अवैध व्यवसाय बंद करण्या करिता परत एकदा निवेदन दिले आहे. #mahawani #rajura #chandrapur #surajthakre
- काही कालांतराने पोलीस अधिकारी बदलतात महिने दोन अवैध धंद्यांना आळा राहतो परंतु कायम स्वरूपी अवैध धंदे बंद का होत नाही. प्रशासनाने तात्काळ अवैध धंद्यांवर आळा न घातल्यास मी स्वतः बेरोजगार मुलांना भांडवल पुरवत सदर धंद्यांना चालना देईल व त्यांना रोजगार मिळवून देईल. मंत्री, आमदार मोहत्सवातच लिन असल्याने वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी कशी थांबणार -सुरज ठाकरे, अध्यक्ष जय भवानी कामगार संघटना तथा आप नेते