अपघातग्रस्त कुटुंबीयांना एस. टी. जी. (STG) लाईफ सायन्सेस कंपनी कडून १४ लाखाची मदत.

Mahawani

 

"तुरी" एस. टी. जी. लाईफ सायन्सेस खाजगी वैद्यकीय कंपनीत दोन महिन्या पासून करत होते काम.



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२३ मार्च २०२४

चंद्रपूर: एस. टी. जी. (STG) लाईफ सायन्सेस (S. T. G. Life Sciences) या खाजगी वैद्यकीय कंपनीत दोन महिने काम केले. सर्व काही सुरळीत सुरू असतांनाच कर्तव्यावरून घराकडे जात असताना १३ डिसेंबर २०२३ रोजी यवतमाळ (Yavatmal) शहराजवळ असलेल्या उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या (CAR) वाहनाने किन्ही येथील नरेंद्र तुरी (Narendra Turi) यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

        कुटुंबाचा आधार असलेला कर्ता माणूस नरेंद्र तुरी यांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले. आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून नरेंद्र तुरी यांनी केवळ दोन महिने कंपनीत सेवा दिल्यानंतरही एस टी जी लाईफ सायन्सेस या कंपनीने त्यांच्या कुटुंबियांना १४,४१,०५० रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली. यावेळी एस टी जी लाईफ सायन्सेस या कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ वर्णा (Srinath Varna) मंगेश जोशी (Mangesh Joshi) यांच्यासमेत तुरी यांची पत्नी आणि कुटुंबीय उपस्थित होते. अपघातग्रस्त परिवाराला आर्थिक सहाय्य केल्याने तुरी कुटूंबीयांनी कंपनी व्यवस्थापकांचे मनापासून आभार मानले आहे. (STG Life Sciences Company) (mahawani) (chandrapur)

To Top