गावातील प्रतिष्ठित, जेष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग.
२० मार्च २०२४
राजुरा/चिचबोडी : पशु वैद्यकीय चिकित्सालय श्रेणी-२ वरूर रोड अंतर्गत मौजा चिचबोडी (Chichbodi) येथे केंद्र पुरस्कृत ॲस्कड (ASCAD) योजने (Centrally Sponsored ASCAD Scheme) अंतर्गत १६ मार्च रोजी तालुकास्तरीय माहिती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री. बंडुजी रागीट (Banduji Ragit) पोलीस पाटील चिचबोडी, श्री. प्रभाकरजी लोहे तसेच गावातील प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात विविध विषयांवर डॉ. नरसिंग तेलंगे (Livestock Development Officer Dr. Narsingh Telange) पशुधन विकास अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व लघु पशु चिकित्सालय, राजुरा व डॉ. एम. डी. हरीणखेडे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) (Dr. M. D. Harinkhede Livestock Development Officer - Extension) यांनी पशुसंवर्धन विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन डॉ. आडे पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor) यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. चव्हान पशुधन पर्यवेक्षक, वरुर रोड, पशूसखी सौ. दसेकर (Animal lover Mrs. Dasekar), पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. (mahawani) (rajura) (chandrapur)