चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेची रेती तस्करावर धडक कारवाई !

Mahawani

 

चंद्रपुर मौजा वडगाव हद्दीत रेती तस्करा विरूध्द गुन्हे शाखेची कारवाई 03 ट्रॅक्टरसहीत 06,03,500/- रू चा मुददेमाल जप्त.



महावाणी - विरेंद्र पुणेकर
०६ मार्च २४

चंद्रपुर : जिल्ह्यातील अवैध रीत्या होत असलेल्या रेती/वाळु तस्कारांवर आळा घालण्या करिता मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर श्री. मुम्मका सुदर्शन Mr. Mumka Sudarshan यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून मौजा वडगाव हद्दितून रेती/वाळु अवैदयरीत्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. महेश कोंडावार  Hon. Mahesh Kondawar यांनी विशेष पथक तयार करून त्यांना रेती/वाळु तस्कांविरूध्द कारवाई करण्यावाबत आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर विशेष पथकाने आज ६ मार्च रोजी मिळालेल्या गोपणिय माहीती वरून मौजा वडगाव हद्दितील ईरई नदी पात्रात सापळा रचुन सदर क्षेत्रातून वाळू वाहून नेत असलेल्या ट्रॅक्टरची झडती घेतली असता सदर ट्रॅक्टर मध्ये वाळू आढळून आल्याने ट्रक्टर क्र. एम एच 34 एल 5325 तसेच ईरइ नदी पात्रात दोन टॅक्टर अवैध रेती भरताना आढळून आल्याने तिन्ही ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. 

        गौन खनिज रेतीची संगणमताने चोरी व चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी 1) शुभम संभा गोवर्धन Shubham Sambha Govardhan (29  रा. अपेक्षा नगर वडगाव, चंद्रपुर 2) बालाजी महदेव जुमनाके Balaji Mahdev Jumnak (38) रा. हनुमान मंदिर जवळ कोसारा चंद्रपूर 3) रमेश नामदेव बदखल Ramesh Namdev Badkhal (50) रा. गुरूदेव नगर, कोसारा पडोली, चंद्रपूर 4) परमीदर सिंग कतार सिंग Parminder Singh Kartar Singh (55) रा. भावना सोसायटी वडगाव चंद्रपूर यांचे कडून ट्रकटर समेत एकूण 6,03,500/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरूध्द पो. स्टे. रामनगर येथे अप. क्र. 249/2024 कलम 379, 511, 34 भा. द. वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Police Station Ramnagar, Chandrapur

            सदर कामगिरी मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू मॅ. Upper Superintendent of Police Rina Janbandhu यांचे मार्गदर्शना खाली महेश कोंडावार, पोनी स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोनि किशोर शेरकी, पोउपनि विनोद भुरले, पोहवा संजय आतकुलवार, नापोअ संतोष यलपुलवार, पो.अ.गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे ब.नं. यांनी यशस्वीपणे केली. #महावाणि #mahawani  #Chandrapur local crime branch action against the sand smuggler #chandrapurpolice

To Top