चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेची घुग्घुस येथे प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाई.

Mahawani

 

मोबाइल समेत एकुण 4,36,505/- रुपये चा मुद्दे माल जप्त


महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ मार्च २०२४

घुघुस : जिल्ह्यात वाढत्या अवैध व्यवसाय पाहता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर श्री. मुंम्मका सुदर्शन यांनी चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहे. पो. नि. महेश कोंडावार (P.I. Mahesh Kondawar) स्था.गु.शा यांनी आपले एक विशेष पथक नेमून अवैध व्यावसाईकांचे मुस्के आवरण्याचे निर्देश दिले होते. काल ११ मार्च रोजी सूत्राकडून मिळालेल्या खात्रीशीर गोपनिय माहीती नुसार पो. स्टे. घुग्घुस अंतर्गत नकोडा येथे चंद्रपुर जिल्ह्यातील गुटखा तस्कर वसिम झिंगरी (Wasim Zingri) याने एका स्थानिक विक्रेता यांचे घरी शासनाने प्रतिबंधित घातलेल्या सुंगधित गुटखा, तंबाखाचा साठा केला असल्याची खात्रीशिर माहीती पो.नि. स्था.गु.शा महेश कोंडावार यांना मिळाली असता यांच्या आदेशाने तपास पथकाने मौजा नकोडा येथील रहीवासी मो. नदीम इक्वाल (Md. Nadeem Equal) मो. जियाऊद्दीन शेख (Md. Ziauddin Shaikh) (३६) रा. नकोडा याचे घरी पंचासह झडती घेतली असता पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला.

1) किंमत 94,956/-रु. 12 प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 579 पाउन प्रत्येकी 200 ग्रॅम होला हुक्का शिपा तुम्बाकू, 2) किंमत 25.740/- रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 130 एडेविमल पान मसाला प्रत्येकी 132 ग्रॅम वजनाचे, 3) किंमत 7680/- रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 1 20पॉकीट प्रत्येकी 40 ग्रॅम इगल हुक्का शिपा तुम्बाकू, 4) किंमत 2004/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 132 पाउचवि । टोबॅको,

5) किंमत 95.565/-रु. (0.3 कागदी खडर्यात एकुण 99 नग डब्बे प्रत्येकी 200 ग्रॅम मजा 108 सुगंधित तंबाकू, 6) किंमत 1.62.150/- रु 04 कागदी खडयांत एकुण 690 नग डब्बे प्रत्येकी 50 ग्रॅम मजा 108 सुगंधित तंबाकू, 7) किंमत 900 /- रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 6 पुड्यामध्ये मध्ये बाजीराव फलंवर पान मसाला, 8) किंमत 3420/- रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 57 पॅकेट बिमल इलायची, 9) किंमत 1410 /- रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 47 पॅकेट BLACK LABLE IS PREMEUM प्रति पॉकेट 30 ग्रॅम वजनाचे, 10) किंमत 250 /- रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 10 पॅकेट DOUBLE BLACK 18 PREMIUM, 11) किंमत 15900/-रु पाच प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 265 पॅकेट अन्नी गोल्ड स्वीट सुपारी, 12) किंमत 14850/- रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 55 पॅकेट राजश्री पान मसाला 180 ग्रॅम वजनाचे, 13) किंमत 600/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 5 पॅकेट विमल पान मसाला, 14) किंमत 180/- रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 6 पॅकेट व्ही- टोबॅको, 15) किंमत 10.000/-रु ओप्पो कंपनीचा काळया रंगाचा वापरता मोबाइल असा एकुण 4,36,505/- रुपये चा माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

    सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखु गुटखा याचे बाबत विचारणा केली असता नमुद मुद्देमाल हा चंद्रपुर येथिल वसिम झिंगरी याने ठेवल्याचे सांगितले आहे. सदर जप्त मुद्देमाल हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपीनि अवैधरित्या विक्रीकरीता साठवून ठेवल्याने आरोपी नाम 1) मो. नदीम इक्बाल मो. जियाउद्दीन शेख (३६) रा. नकोडा 2) वसिम झिंगरी रा. घुटकाळा वार्ड चंद्रपुर यांचे विरुद्ध पो.स्टे. घुग्घूस अप.क्र. 101/2024 कलम 328,188.272,273,34 भादंवी सह कलम 30 (2). 26 (2) (अ). 3. 4, 59 (1) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोपी नामे मो. नदीम इक्बाल मो. जियाउद्दीन शेख वय 36 वर्षे रा. नकोडा यास पो.स्टे. घुग्घुस यांचे ताब्यात देण्यात आले.

उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा.. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे आदेशाने सांनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, गोअं. प्रशांत नागोसे चापोहवा दिनेश अराडे यांनी केली. (Local Crime Branch Chandrapur) (chandrapur police) (mahawani) (ghughus)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top