गडचांदूर येथे आमदार चषक व्हालीबाल स्पर्धेचे थाटात उद्घाटन.

Mahawani
1 minute read
0


स्पर्धेत आकर्षक पारितोषिके ; अनेक नामांकित संघांचा सहभाग 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०२ मार्च २४

कोरपना/गडचांदूर : दृढ संकल्प स्पोर्टींग क्लबचे स्वर्गीय विजय डाहुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जि. प. प्राथमिक शाळा गडचांदूर येथे आयोजित आमदार चषक व्हालीबाल स्पर्धेचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत अनेक आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आले असून अनेक नामांकित संघांनी यात सहभाग घेतला आहे. (Popular MLA Subhash Dhote)

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष सविताताई टेकाम, प्रमुख अतिथी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, नगरसेवक राहुल उमरे, अर्चना वांढरे, जनार्दन डाहुले, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, प्रा. हेमचंद्र दुधगवडी, डॉ. कुलभूषण मोरे, शैलेश लोखंडे, पंडित काळे, सुषमा डाहुले, देविदास मून, महाविर खटोल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले, प्रास्ताविक विकी मून यांनी केले तर आभार प्रदर्शन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी मानले. यावेळी स्थानिक क्रीडाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. #mahawani #Shantanu Dhote #korpana #MLA Cup

Tags

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top