आत्ताची गॅरंटी की आधीचे जुमले? अशा प्रश्नांनी उडविण्यात येत आहे मोदी गॅरंटी ची खिल्ली.
०८ मार्च २४
राजुरा : विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी या चारही तालुक्यातील प्रमुख शहरे व गावांमध्ये आत्ताची गॅरंटी की आधीचे जुमले अशा विविध प्रश्नांनी मालिका उपस्थित करून भाजप सरकार कडून विविध माध्यमातून सकाळ, दुपार, संध्याकाळ सुरू असलेल्या मोदी की गॅरंटी या जाहिरातीची खिल्ली उडविली जात आहे. सन २०१४, सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या विविध आश्वासनांचे नेमके काय झाले?, ती का पुर्ण करण्यात आली नाहीत, ती पुर्ण करण्यापासून कोणी थांबविले? मागील दहा वर्षांत दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत तर मग आत्ता दिली जाणारी मोदी की गॅरंटी देऊन नेमके काय दिवे लावले जाणार आहेत. की ही गॅरंटी सुध्दा तशीच जुमले ठरणार आहे का? असे प्रश्न उपस्थित करून चौका-चौकात नागरिक या गॅरंटीची खिल्ली उडवितांना दिसून येत आहेत.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर, मोक्याच्या जागी झळकलेल्या या बॅनर नी स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले जात असून स्थानिक नागरिक चौका-चौकात या बॅनर वर उपस्थित केलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना दरवर्षी २ कोटी रोजगार देणार होते त्याचं काय झालं?, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचे काय झाले ?, वाढत्या महागाईचे काय झाले?, सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलांच्या भडकलेल्या किमती का कमी करण्यात आल्या नाहीत?, भाजप सत्तेत येण्यापूर्वी श्रीमती स्मृती इराणी Smriti Irani ह्या गॅस सिलेंडर घेऊन आंदोलन करून सिलेंडर दरवाढीचा निषेध करायच्या, आता सिलेंडर चे दर तिप्पटीने वाढले तरी भाजप सरकार त्या का कमी करत नाहीत?, महिला सशक्तिकरण व त्यांच्या सुरक्षेचे काय झाले?, काळे धन व भ्रष्टाचाराचे काय झाले? अशा विविध विषयांवर परिसरातील युवक, महिला, जेष्ठ नागरिक खमंग चर्चा करतांना दिसत आहेत. #rajura #mahawani #Modi-Guarantee