सार्वजनिक लोकसभा निवडणुक - २०२४ विशेष ऑल आऊट ऑपरेशनसाठी स्वतः पोलिस अधिक्षक व अपर पोलिस अधिक्षक, चंद्रपुर कारवाईसाठी मैदानात
२० मार्च २०२४
चंद्रपूर : निवडणुक आयोगाने सार्वजनिक लोकसभा निवडणुक २०२४ जाहिर केली असुन चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रात मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी निश्चित करण्यात आले असुन सदरची निवडणुक सुरळीत व शांततेत पार पळण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन दिनांक १९ मार्च रात्रो १२ वा ते २० मार्च सायंकाळ ०६ वाजे पर्यंत. स्वतः पोलिस अधिक्षक व अपर पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत ऑल आऊट ऑपरेशन (All out operation) व ३५ ठिकाणी नाकाबंदी करून मोहिम राबविण्यात आली.
सदर मोहिमेच्या दरम्यान ७८ हॉटेल, लॉजेस, धाबे तपासात ८२१ वाहनाची तपासणी करुन ६४ वाहनावर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करुन त्यांच्याकडुन १०,७००/- रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मोहिमे दरम्यान रेकॉर्ड वरील फरार तसेच कारागृहातुन सुटलेले एकुण १५४ आरोपींचा तपास करून मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यातील १६० समन्स बजावणी करुन ६१ आरोपींना पकड वॉरन्टद्वारे अटक (61 Circles Arrested Through Arrest Warrants) करुन गजाआड करण्यात आले.
ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अवैध दारु बाळगणाऱ्यावर २२ गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर (Police Station Ramnagar) येथे १ तर पोलिस स्टेशन बल्लारपूर (Police Station Ballarpur) येथे २ भारतीय शस्त्र कायदयान्वये एकुण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधीत तंबाखु बाळगणाऱ्या इसमाविरुध्द अन्न सुरक्षा अधिनियम-२००६ अन्वये पोलिस स्टेशन राजुरा (Police Station Rajura) येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकांने गुन्हा नोंद करुन त्याचेकडुन ३,३६,२००/- रुपयाचा सुगंधीत तंबाखु व वाहन किंमत ५,००,०००/- रुपये असा एकुण ८,३६,२००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर ऑल आऊट ऑपरेशनमध्ये श्री. मुम्मका सुदर्शन, पोलिस अधिक्षक, चंद्रपुर (Mummaka Sudarshan, Superintendent of Police, Chandrapur) यांचे नेतृत्वात रिना जनबंधु, अपर पोलिस अधिक्षक,चंद्रपुर,सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, चंद्रपुर जिल्हा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन मधील ५२ पोलिस अधिकारी व २६५ पोलिस अंमलदार यांनी मोहिमेत भाग घेतलेला आहे. (mahawani) (chandrapur) (ballarpur) (rajura) (Special all out operation in Chandrapur district)