कुऱ्हाडीच्या प्राणघात हल्ल्याने तिघांचा जागीच मृत्यू !

Mahawani

 

चंद्रपुर जिल्ह्यात चाल्लय तरी काय ? जिल्ह्यात वर्षाच्या सुरवातीपासून हत्येचे सत्र सुरूच !

महावाणी - विरेंद्र पुणेकर 
०४ मार्च २४

चंद्रपूर/नागभीड : अगोदरच मागील महिन्यात जिल्ह्यात चंद्रपूर, गोंडपिपरी, कोरपना, बल्लारपूर क्षेत्रात हत्येने सर्वत्र चंद्रपूर जिल्हा हादरला असतांना पुन्हा काल 3 मार्च रोजी नागभीड तालुका तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना नागभीड तालुक्यातील मोर्शी येथे घडली असून सूत्राच्या माहिती नुसार मध्यरात्री पतीने आपल्या 2 मुली व पत्नीला कुऱ्हाडीच्या वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

    सदर तिहेरी हत्याकांड नागभीड तालुक्यातील मौशी येथील अंबादास तलमले (५०) Ambadas Talmale हे आपल्या कुटुंबासह मोर्शी येथे वास्तव्याला होते. माहिती नुसार काही दिवसा पूर्वी पासून तलमले कुटुंबात कौटुंबिक वाद सुरू होता. सदर कौटुंबिक वादाचे रूपांतर काल रात्रौ तिहेरी हत्याकांडात परिवर्तित झाल्याने सर्वत्र चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  

     हत्याकांडातील आरोपी अंबादास यांनी आपल्या २० वर्षीय मुलगी प्रणाली, इयत्ता १२वि ला शिकत असलेली लहान मुलगी तेजु व पत्नी अल्का तिघांवर कुऱ्हाडीने प्राणघात हल्ला केल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून नागभीड पोलिसांनी सदर हत्याकांड प्रकरणी आरोपी अंबादास तलमले यांना बेळ्या ठोकल्या असून पुढील तपास नागभीड पोलिस करत आहे. #Mahawani #Ambadas Talmale #Naghbid #Nagbhid-massacre #chandrapur #mhpolice 

To Top