सास्ती येथे दोन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडुन मृत्यू !

Mahawani


आर्थिक मदतीची मांग - सास्तीत तणावाचे वातावरण तणाव !

महावाणी - विरेंद्र  पुणेकर
०२ मार्च २४

राजुरा/सास्ती :  तालुक्यातील सास्ती गावात आज 2 मार्च रोजी सकाळी शाळा संपवून नाल्यात पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू. दोन्ही मुलांचे प्रेत पाण्यावर काढले असून. मृतकाचे नाव पियुष राकेश सिडाम (Piyush Rakesh Siddam) १७, साहिल रमेश कुंदलवार (Sahil Ramesh Kundalwar) 15, असून दोन्ही मित्र सास्ती लगतच्या नाल्यावर शाळा पूर्ण करून पोहण्यासाठी गेले होते.

        प्राप्त माहितीनुसार सास्ती या गावाला पाणीपुरवठा करणा-या इनटेक (Intake) विहीरीजवळ नाल्याचे बाजुला वेकोलिच्या (WCL) चड्डा कंत्राटी कंपनीने मातीचे ढिगार उभे केले असल्याने या ठिकाणी नाल्याचे पाणी थांबून तलाव निर्माण झाले आहे. तलावात जमा झालेल्या पाण्यात हे दोन विद्यार्थी पोहायला गेले त्याठिकाणी पाणी माती एकत्रित झाल्याने गाळ तयार झाला असून दोन्ही विध्यार्थ्यांना सदर गाळाचा अंदाज न आल्याने ते पाण्यातील गाळात फसले आणि त्यातच त्या दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यातील पीयुष हा इयत्ता 11 वी तर साहिल इयत्ता 9 वी ला होता.

        घटनेची माहिती मिळताच गावकरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली पोलिसांच्या उपस्थितीत दोघांचे प्रेत बाहेर काढण्यात आले. मात्र कंपनीने नाला रोखून तलाव निर्माण केलामुळे दोन विद्यार्थ्याचा बळी गेला असून कंपनीने दोन्ही विद्यार्थ्यांचा परिवाराला तातडीने आर्थीक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सदर भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथुन जमावाने प्रेत उचलु दिले नाही. (sasti) #rajura #chandrapur #Two students drowned in the drain in Sasti #mahawani #mahapolice

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top