अहेरी येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नाली बांधकामाचे भूमिपूजन.
१४ मार्च २०२४
राजुरा : तालुक्यातील मौजा अहेरी येथे शहिद वीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त (Martyr Veer Baburao Shedmake Jayanti) अभिवादन तथा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे (Subhash Dhote) यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले, अहेरी ग्रामपंचायत (Aheri) येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर नाली बांधकामाचे भूमिपूजन देखील पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. धोटे यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे अनमोल योगदान राहिले आहे. जंगोम सेना उभारून त्यांनी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरोधात गोंडवानातून बुलंद आवाज उठविला. तीनदा ब्रिटिश (British) सैन्याचा पराभव केला. शेवटी कपटनीतीने इंग्रजांनी त्यांना पकडले. कॅप्टन डब्ल्यू. एच. क्रिक्टन च्या आदेशाने चांद्याच्या तुरूंगात फाशी दिली. त्यांच्या या बलिदानाला आजच्या पिढीने लक्षात घेऊन शिक्षित, संघटित होऊन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले.
या शनी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जेष्ठ काँ. नेते शंकर गोनेलवार, तालुका यु. काँ. अध्यक्ष उमेश गोणेलवार, कृ. उ. बा. स. संचालक संतोष इंदूर वार, कवडू सातपुते, सरपंच भारत शेडमाके, उपसरपंच प्रतिभा डाखरे, तमुस अध्यक्ष वंदना चौधरी, ग्रा प सदस्य नवनाथ गेडाम, कैलास कातकर, लता शेडमाके, रेखा आदे, तुळशीराम शेडमाके, विठाबाई मडावी, मोरेश्वर शेरकी यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
(mahawani) (rajura) (congress) (Veer Baburao Shedmake Jayanti)