तीन वेळच्या आमदारकित भाऊने कुणाचा केला विकास ?

Mahawani

 

१५ वर्ष आमदार पदाच्या कारकीर्दीत सुधीरभाऊंनी बल्लारपूर शहरात कुठला केला विकास ? -रविकुमार पुप्पलवार


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२३ मार्च २०२४

बल्लारपूर : नुकतेच खासदारकीच्या रिंगणात उतरलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार (MLA Sudhirbhau Mungantiwar) यांच्या विकासकामांवर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार (Aam Aadmi Party city president Ravibhau Puppalwar) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. "फक्त करोडोंच्या इमारती, रस्ते, सौंदर्यीकरण यालाच सर्वसामान्यच विकास म्हणावा का? या मोठ मोठ्या कामाने सामान्य जनतेला काय मिळाले? विकासपुरूष म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुधीरभाऊंनी शहरातील शासकीय शाळेमधील अवस्था सुधारण्याकडे आजपर्यंत लक्ष दिले नाही परंतु विद्यार्थांना अभ्यासा साठी दिलेल्या बुकावर आपले छायाचित्र छापून प्रचार मात्र केला. यालाच विकास म्हणावे का? 

  • शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारली मात्र सामान्य जनतेसाठी रूग्णालयात वैद्यकीय सोय-सुविधांचा अभाव आजही तसाच आहे. या कडे सुधीरभाऊंनी कधीच लक्ष का दिले नाही.
  • बल्लारपूर शहरात कित्तेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून जनतेला दिलेल्या अव्या-ढव्या पाणी करा कडे कधी लक्ष दिले नाही. चंद्रपूर व राजुरा शहराप्रमाणे वार्षिक सरासरी पाणी कराची सोय बल्लारपूर शहरातील नळ धारकांना करून देण्यासाठी आमदार साहेबांनी आजपर्यंत प्रयत्न का केले नाही ? 
  • औद्योगिक शहर म्हणून मोजल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहरात प्रचंड सुशिक्षित बेरोजगारांची संख्या असून भाऊंनी आपल्या १५ वर्ष आमदारकीच्या कारकीर्दीत रोजगार वाढविण्यासाठी रोजगार मेळावा घेण्या शिवाय दुसरे काय प्रयत्न केले? 
  • पेपरमीलमुळे होणारे प्रदूषण यावर कोणतेही पाऊले उचलले नाही. पेपरमीलच्या स्टॉक यार्डमुळे शहरात प्राण्यांचा हैदोस वाढला असतांना देखील वनमंत्री म्हणून कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. 
  • शहरातील नागरिकांना अव्या-ढव्या गृह कर पाठविला जातो त्यावर भाऊंनी कोणतेही कार्य केले नाही. विकासपुरुषांचा विकास सामान्य जनतेच्या कधीही कामी आला नाही.

असे प्रश्न पुप्पलवार यांनी उपस्थित केले आहे. मा. आमदार साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यात अनेक मंत्रीपदे उपभोगल्यानंतर आता ते खासदार पदाच्या मैदानात उतरले आहे. आत्ता खासदार होऊन सर्व सामान्य जनतेचा विचार करतील कि फक्त विकासाचा देखावाच्या मागे कमिशनचा कारभार करतील हे आपल्याला बघावे लागेल असे देखील रविभाऊ पुप्पलवार बोलत होते. (mahawani) (ballarpur) (ravikumar puppalwar) (sudhir mungantiwar) (loksabha 2024) (What development did the three-time MLA's brother do?)



To Top