शेतकऱ्यांचा वाढत्या आत्महत्ये मागे कारणीभूत कोण ?
०४ मार्च २४
राजुरा/गोवरी : तालुक्यातील गोवरी येथील युवा शेतकऱ्याने ३ मार्च रोजी सायं. ४ वाजताच्या सुमारास शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली असून शुभम सुधाकर जुनघरी Shubham Sudhakar Junghari (३०) रा. गोवरी ता. राजुरा असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. शुभम हा रविवार ३ मार्च रोजी सायं. ४ वाजताच्या सुमारास शेतकामा करिता शेतात गेला परंतु सायंकाळची रात्र वायला आली शुभम शेतातून घरी परतला नाही काळजी पोटी कुटुंबीयांनी त्याचा शोध घ्यायला सुरवात केली अगोदर गावात, नियमित असतो अश्या ठिकाणी मात्र तो गावात मिळाला नसल्याने शेतात शोध घेतला असता शुभम विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला.
शुभमने विष प्राशन केले आहे समजताच त्याला तातडीने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात Rajura Sub District Hospital दाखल करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने शुभमला मृत घोषित केल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. शांत, मनमिळावू स्वभावाच्या शुभमचे अकस्मात निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शवविच्छेदन Postmortem करून आज सोमवार त्यांचेवर गोवरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शुभमचे विष प्रशान करत स्वतःला संपवण्याचे कारण अजून स्पष्ट झाले नसून समोरील तपास राजुरा पोलीस करत आहे. #rajurapolice #gowari #shubhamJunghari #mahawani #farmersuicide
- सदर आत्महत्येचे कारण डोक्यावर असलेले बँकेचे कर्ज व सतत झालेली नापिकी आहे. -शेषराव बोंडे, नेते, शेतकरी संघटना