चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मादक पदार्थ (एम. डी मेफोड्रॉन) वर कारवाई.

Mahawani
2 minute read

 

पोलीस स्टेशन रामनगर कडून 7.68 ग्रॅम एम.डी (मेफोड्रॉन) पावडर व होडा ऍक्टिवा वाहन जप्त.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०३ एप्रिल २०२४

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखाने काल २ एप्रिल रोजी मुखबिराव्दारे मिळालेल्या खबरे नुसार आरोपी शेख नदीम शेख रहीम (Sheikh Nadeem Sheikh Rahim) रा. बंगल खिडकी, चंद्रपूर हा त्याचे खाजगी मोटारसायकल ने एम. डी . (मेफोड्रॉन) (M. d. mephodrone) पावडर घेवुन विक्री करीता बंगल खिडकी, गेट येथे येणार आहे अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने सदर खबरचे माहिती मा. महेंश कोंडावार (Mahensh Kondawar), पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांना देवुन सदर खबरेची सहानिशा करण्याकामी सदर ठिकाणी जावुन शेख नदीम शेख रहीम यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे फुलपॅन्टच्या खिशात 7.68 ग्रॅम वजनाचे एम. डी (मेफोड्रॉन) पावडर व एक होडा ऍक्टिवा असा एकुण ५३०४०/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीस रामनगर पोलीस स्टेशन ला सुपूर्त करण्यात आपले आहे. (mahawani) (chandrapur police) (Selling illegal drugs) (lcb)

To Top