आदर्श आचार संहिता सुरु असतांना राजुऱ्यात चक्का जाम आंदोलन.

Mahawani

 

आंदोलन सुरु असतांना भर रस्त्यात घेतला जेवणाचा आस्वाद.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१७ एप्रिल २०२४

राजुरा : आदर्श आचार संहिता सुरु असतांना काल रात्रौ ११ च्या सुमारास नाका न. ३ येथे प्रभू श्री राम नवमी प्रीत्यार्थ लावण्यात आलेले बॅनर काढल्याबने राम भक्तांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले आंदोलनाने सर्वत्र मार्गाची कोंडी होत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. नगर परिषद राजूरा (Municipal Council Rajura) कडून प्रभू श्री राम नवमी निमित्य लावण्यात आलेले काही बॅनर काढण्यात आल्याने नागरिकात रोष निर्माण झाला असल्याने काल रात्रौ ११ च्या सुमारास राम भक्तांकडून चक्का जाम आंदोलन उभारण्यात आले होते.

आंदोलनात नगर परिषद, राजूराने प्रभू श्री राम नवमी निमित्य लावलेले बॅनर्स काढल्याने नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मांग आंदोलनकार्याकडून केली जात आहे. नका न. ३ येथे लागलेल्या बॅनर वरती "जो राम को लाये है हम उनको लायेंगे" (We will bring whoever brought Shri Ram) असे लेखान केले असल्याने नगर परिषद, राजुरा कडून सदर बॅनर काढल्याने राजूरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

चक्का जाम आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. देवराव भोंगळे, (Devrao Bhongale) माजी आमदार संजय धोटे, भाजप कार्यकर्ते व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरु असतांनाच भर रस्त्यात घेतला जेवणाचा आस्वाद.


आंदोलन कि ? दिखावा

अन्नाचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्याला आव्हान येत्या २० तारखेला मुख्याधिकारी यांचे निलंबनाचे आदेश काढून दाखवावे तेव्हा आपण खरे राम भक्त असे समजू. कालच्या आंदोलनाची कुठलीही ठाम भूमिका नसून फक्त दिखावा होता. कालच्या आंदोलनावर संशय येतो कि, आपण सत्ताधारी पक्ष आहात विद्यमान पालकमंत्री (Guardian Minister) हि आपलेच आहेत तरीही आपण आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून आंदोलन पुकारले व शासन नियमाची पायमल्ली केली आहे. येत्या २० तारखेला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचे निलंबनाचे आदेश काढून जनतेला आपल्या आंदोलनाची सत्यता दाखवून द्यावी. -सुरज ठाकरे, आप, जिल्हा उपाध्यक्ष (Suraj Thackeray)
(mahawani) (rajura) (shri raam Navami) (chakka jam andolan)
To Top