जेष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांचे व्याख्यान
१२ मे २०२४
राजुरा : ॲड.वामनराव चटप (Adv. Vamanrao Chatap) मित्रमंडळ चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जीवती व गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ मे २०२४, रोज सोमवारला दुपारी एक वाजता राजुरा येथील उद्धव मंगल कार्यालयात माजी आमदार आणि ज्येष्ठ शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (shetkari sanghatna)
या सोहळ्याला ॲड. चटप यांचे गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाला ॲड. दिनेश शर्मा यांचेसह अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. वामनराव चटप मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (73rd birthday of Adv. Vamanrao Chatap) (mahawani) (rajura)