आठ ते दहा चोरट्यांच्या टोळीने उडवल्या वेकोलिच्या दिळ ते दोन लाख रुपयाचे मोटारी व विद्युत तारे.
२१ मे २०२४
राजुरा/गोवरी कॉलनी : वेकोलि गोवरी कॉलनी क्षेत्रात चोरीचे सत्र सुरूच मागील आठवड्यात पुराणी गोवरी कॉलनी येथील ठोंबरे यांच्या राहत्या कॉटर्सचे टाळे तोडून चोरट्याकडून रोरिचा प्रयत्न झाला होता सुदैवाने सदर प्रयतनात चोरट्याच्या हाती काही लागले नाही. याच सोबत गोवरी १ चेक पोस्ट समोरील ढाब्या वर देखील टाळे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता.
काल रात्रौ पुन्हा ०२:०० च्या सुमारास गोवारी कॉलनी येथील मुख्य चौकात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून केंद्रात बसवण्या करीता आणलेल्या नवीन मोटारी व विद्युत तारे चोरी गेल्याची माहिती समोर येत आहे. सदर चोरी रात्रौ ०२:०० च्या सुमारास झाली असून ह्या वेळी २ वेकोलि कर्मचारी आपल्या कार्यावर उपस्थित होते व सदर चोरी होतांना चोरटे हे ८ ते १० च्या संख्येने असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांना अडवणे अशक्य झाले असे कर्मचारी बोलत आहे. चोरीला गेलेल्या मुद्दे माल दिळ ते दोन लाख रुपयाचे असल्याचे घटनस्थळी उपस्थितांना कडून समोर येत असून जलशुद्धीकरण केंद्रात नवीन मोटारी असल्याची माहिती सदर चोरट्यांना कुठून व कशी मिळाली हा चर्चेचा विषय आहे.
वेकोलि क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक असूनहि सदर चोरटे चोऱ्या नियमित करत असल्याने वेकोलि सुरक्षा विभागावरती प्रश्न चिन्न उपस्थित होत आहे. सदर चोऱ्या आज पासून नसून कित्तेक काळापासून वेकोलि क्षेत्रात होत येत आहे. याच गंभीर समस्या पाहता वेकोलिने बी. एस. एफ (bsf) दलाची तैनाती केली आहे परंतु आज दलाच्या तैनातीने चोऱ्या कमी होण्या ऐवजी चोऱ्या पुन्हा मोठ्या संख्येने वाढल्याचे दिसून येत आहे. (A thief cleaned his hands in the water treatment plant at Gowri Colony)
सदर क्षेत्रात चोरट्याचे दिवसोन दिवस वावर वाढत असल्याने क्षेत्रीय नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्वरित सदर चोरट्यांची विल्ले वाट लावावी असे स्थानकातून वेकोलि व पोलीस प्रशासनाला बोलले जात आहे. (mahawani) (rajura) (wcl) (gowari colony)
- चोरीचे प्रकरण इतक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुरक्षा रक्षकच यात गुंतून आहे कि काय असा संशय येते. वेकोलि सुरक्षा रक्षकावर चोरीत मदत केली असल्या संधर्भात खटले हि सुरु आहे. - मेथीऊ, व्यवस्थापक, गोवरी क्षेत्र