मनुस्मृती पुरस्कृत आराखडा तात्काळ रद्द करण्या करिता शिक्षण मंत्री यांना निवेदन.

Mahawani


वंचित बहुजन आघाडी तालुका, बल्लारपूर तर्फे मा. तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०१ जून २०२४

बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मनुस्मृतीचा पुरस्कार करणारा शैक्षणिक आराखडा जाहीर केला असून फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंकित करण्याच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. तेव्हा मनुस्मृती पुरस्कृत आराखडा तात्काळ रद्द करण्यात यावा. मनस्मृतीने देशातील नागरिकांना समतेचा अधिकार, महिलांचे स्वातंत्र्य ,विकासाच्या संधी, नाकारल्या असल्याने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती चे दहन केले आज तेच मनुस्मृतीमधील श्लोकाच्या समावेश शैक्षणिक आराखड्यात होत असेल. तर ही बाब विद्यार्थ्याकरिता मोठी गंभीर बाब आहे. सध्याच्या काळामध्ये प्रस्थापित सरकार च्या मार्फत शैक्षणिक आराखड्याच्या आडून राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मनुस्मृती लादून शिक्षण प्रणाली ही गोरगरिबांच्या मुलांना गुलामीच्या विषमतेमध्ये बांधणारी होय. याद्वारे देशाच्या भावी पिढीला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. तेव्हा सदर शैक्षणिक आराखडा रद्द करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्राच्या प्रत्येक चौकात मनुस्मृति दहन करण्यात येईल. (Abolish the Manusmriti sponsored scheme immediately)

        अशी मागणी काल ३१ मे रोजी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका कडून माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. याकरिता वंचित बहुजन महिला आघाडी चे जिल्हाध्यक्ष सौ कविताताई गौरकार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मा. मधुकर जी उराडे व तसेच वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हा सल्लागार सत्यभामाताई भाले व वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सदस्य सुदेश शिंगाडे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष गोंडपिपरी प्रकाशजी तोहोगावकर प्रमुख उपस्थित होते, तसेच वंचित बहुजन महिला आघाडी तालुकाध्यक्ष नम्रता ताई साव, तालुका संघटिका प्रज्ञाताई नमनकर, तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी एड. प्रवीण जानगे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष अभिलाष चूनारकर, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष ओम रायपुरे, रेखाताई पागडे वंचित बहुजन महिला आघाडी शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष प्रशांत सातकर, संघटक पराग जांभुळकर, धर्मेंद्र गायकवाड देवराव नंदेश्वर नंदा देशभ्रतार पंचशीला वेले प्रतिमा खेकारे जितेंद्र करमणकर शुभम सोनटक्के, स्वराज करमणकर,तसेच वंचित बहुजन आघाडीचे अनेक उपस्थित होते. (mahawani) (ballarpur) (vanchit bahujan aghadi)

To Top