मद्य दुकानांच्या निरीक्षण कार्यात अशासकीय सदस्य द्या.

Mahawani

 

वसूली थांबवण्यासाठी काँगेस नेत्याचा लक्षवेध ; नियमित सीसीटीव्ही फुटेज पडताळणी ची मागणी !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०१ जून २०२४

चंद्रपूर : जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या नुकत्याच घेतलेल्या दारु परवाना धारकांच्या बैठकीत उत्पादन शुल्क विभागाचे पितळ उघडे पाडले गेले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे घटनेचा संदर्भ देत ज्येष्ठ काँगेस नेत्याने विशेष लक्षवेध केला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मासिक तपासणी दरम्यान होणारा भ्रष्टाचार थांबावा म्हणून यात एखाद्या अशासकीय सदस्याचा समावेश करता येईल का ? अशी विचारणा प्रदेश काँग्रेस सचिव विजय नळे (Vijay Nale) यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षका सह उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या पत्रात काँग्रेस नेते नळे यांनी विचारणा केली आहे.

        शहरात सर्रास अपघात होत आहेत यात मद्य पिणाऱ्या अवयस्क मुलांकडून होणारे अपघात जास्त आहेत. मद्यासाठी ईतर अनेक गुन्हे वाढताना दिसत आहेत. अशा किशोरवयीन मुलांना मद्य दिले की नाही याची तपासणी सबंधित बार, मद्य  दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून (CCTV Camera) करावी अशी मागणी नळे यांनी केली आहे. बार आणि मद्य विक्रेत्यांना त्यांच्या सोयीचा रिपोर्ट तयार करून दिला जातो. या करीता मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचे नुकतेच लाच लुचपत विभागाने (ACB) केलेल्या कारवाईतून समोर येत आहे. यामुळे काही विक्रेते अवैध मद्य विक्री करू लागले आहे. असा तर्क यातून काढण्यात आला आहे. (Assign non-governmental members to monitor liquor shops)

सर्वांकडे सारखे लक्ष कसे जाणार ?

        सद्या जिल्ह्यात मद्यबंदी नसल्यानें मद्य सहज उपलब्ध आहे. अश्यात सीमेवरील गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मद्य तस्करी कुठल्या जिल्ह्यातून होत असेल ? असे प्रश्नही ओघाने येत असतात. याशिवाय मद्य तस्करीत पोलीसांचे हात जास्त नशिले होताना दिसतात. दारु पकडुन वाहन चालकाला अटक करणे आणि वाहन जप्तीत दाखवणे एवढेच सोपस्कार केले जातात. ती दारू कुणाची आणि कुणाला पोहोचवली जात होती ? या साध्या तर्कातून दोन मुख्य आरोपी सहज गजाआड होऊ शकतात. परंतू असे खूपदा होतच नाही. या संदर्भात प्रामाणिकपणे कार्यवाही झाली तर उत्पादन शुल्क विभागाच्या काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर ताशेरे येऊ शकतात. याकडेही कुणीतरी लक्षवेध करणे गरजेचे आहे. असे लोकांचे म्हणणे आहे. (mahawani) (chandrapur) (acb) (mahpolice) (Excise Department) #spchandrapur

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top