जिल्ह्यातील वाळूअभावी बांधकामे ठप्प; प्रशासनाने यावर मार्ग त्वरित मार्ग काढावे !

Mahawani

 

अवैध रेती तस्करी करणाऱ्यां सोबत अधिकाऱ्यांची साठगाठ आहे कि काय ? -रवीकुमार पुप्पलवार


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२७ मे २०२४

चंद्रपूर : बल्लारपूर शहरात तसेच जिल्हातील ग्रामीण भागात अनेक महिन्यांपासून बांधकामासाठी वाळू मिळणे कठिण झाले आहे. परंतु अव्वाच्या सव्वा भावात वाळूचा शहरात ग्रामीण क्षेत्रात अवैध पुरवठा सुरूच आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आम आदमी पक्षाने वारंवार तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केले असतांना देखील या प्रश्नावर अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. (Tehsildar Sub Divisional Officer)

        याच प्रमाणे राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर नजीकच्या शहरी व ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आवास योजनेचे कामे सुरु आहे. शासन प्रत्येकांना घर हि मोहीम राबवून घरकुल देत आहे परंतु तेच घर बांधकाम करण्या करीता वाळूच नाही. वाळू अभावी घराचे बांधकाम करावे तरी कसे असे प्रश्न घरकुल लाभार्त्याकडून सतत विचारले जात आहे. घरकुल लाभार्त्याना नाईलाजाने जास्तीचे पैसे मोजून अवैध व्यावसायिकांकडून वाळू घ्यावी लागत आहे. याने अवैध व्यावसायिकांची गुंड प्रवृत्ती व धाडस पुन्हा वाढत आहे. स्थानिक कर्मचारी, महसूल अधिकारी, पोलीस प्रशासनाला नजुमानता वाळू तस्करांची तस्करी निरंतर सुरूच आहे. (Housing Scheme Works)

        यामुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांच्या सोबत अधिकाऱ्यांनी हातमिळवणी तर केली नसेल ? (Aam Aadmi Party) असा प्रश्न आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार (Ravi Bhau Puppalwar) यांनो उपस्थित केला आहे. अनेक महिन्यांपासून शहरात बांधकाम क्षेत्र विविध अडचणींचा सामना करत आहे, यात सर्वाधिक अडचण वाळूपुरवठ्याच्या अभावामुळेच निर्माण झाली आहे. शहरातील शेकडो बांधकामे वाळूअभावी बंद पडली आहेत. यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे.

        सामान्य नागरिकांना रेतीचा पुरवठा होऊ शकत नसेल तर नगरपरिषदेने बांधकामासाठीची परवानगीच द्यायला नाही पाहिजे. जोपर्यंत कायदेशीर रेतीपुरवठा होत नाही तोपर्यंत एक मध्यममार्ग म्हणून शहरात समिती नेमून त्यामार्फत रेतीचा पुरवठा सुरू ठेवायला हवा. यामुळे अवैध रेती पुरवठा देखील बंद होईल व नागरिकांची सुद्धा गैरसोय होणार नाही असे रविभाऊ पुप्पलवार माध्यमाशी बोलताना म्हणाले. (mahawani) (ballarpur) (chandrapur) (rajura) (Department of Revenue)

To Top