गोवरी कॉलोनी क्षेत्रात एकाच दिवसी दोन घर फोडीचे प्रकरण उघडकीस.

Mahawani


स्थानिकातून पोलीस प्रशासनाला चोवीस तास पाळत घालण्याची विनंती.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१२ मे २०२४

सास्ती/गोवरी कॉलोनी : काल रात्रो ०२:०० च्या सुमारास गोवरी कॉलोनी नजीक गोवरी १ शेत्रातील वे.को.ली (WCL) चेक पोस्ट समोर असलेल्या ढाब्याचे टाळे तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला आहे. ढाबा चालक रात्रो ११ वाजता आपला ढाबा बंद करून गोवरी कॉलोनी स्थितः आपल्या घरी गेला होता. सकाळी ढाबा उघडण्या करिता परत आला असता ढाब्याच्या लोखंडी दाराचा लागलेला ताळा तुटला होता. तुटलेला ताळा पाहता तत्काळ ढाबा चालकाने पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली पोलिसांनी व ढाबा चालकाने ढाब्याची पाहणी केली असता सध्यातरी ढाब्यातून कुठलीही वस्तू चोरीला गेली असल्याची माहिती ढाबा चालका कडून आलेली नाही. 

    याच सोबत रात्रो ०२:३० च्या सुमारास गोवरी कॉलोनी येथील कॉटर क्र. एम/५७ विजय ठोंबरे (Vijay Thombre) यांच्या कॉटरचे लोखंडी सलाखीने टाळे तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला विजय ठोंबरे व परिवार हे काल आपल्या वैयक्तिक कामा करिता नागपूरला गेले होते काम पूर्ण करून ते आज सकाळी ०८:०० वाजता घरी आले तेव्हा घराच्या दाराला असलेला ताळा तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने व दारा समोर वजनी लोखणी सलाख व क्रिकेट खेळण्याची बॅट पडून दिसल्याने घरात चोरी झाली असल्याचे ठोंबरे परिवाराच्या निदर्शनात आले. त्यांनी तत्काळ घरात जाऊन पाहणी केली असता घरातील कुठलीही वस्तू चोरी गेली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

        एकाच दिवसी एकाच शेत्रात दोन घर फोडीचे प्रयत्न झाल्याने स्थानिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जरी का झालेल्या दोन्ही घर फोडीच्या प्रयत्न चोराला यश मिडाले नसले तरी तो चोर पुन्हा सदर शेत्रात चोरी करण्याचा प्रयत्न करणांर नाही हे नाकारता येत नाही. करिता स्थानिकातून पोलीस प्रशासनाला चोवीस तास सदर शेत्रात पाळत ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे. (mahawani) (rajura) (gowari colony) (wcl check post)

To Top