आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी.

Mahawani

 

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ मे २०२४

कोरपना : कोरपना तालुक्यातील मौजा जेवरा आणि लोणी परिसरात दि. ६ मे २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यामध्ये अनेकांच्या घरांचे छत उडाले, घरांना, भिंतींना भेगा पडल्या, झाडे उन्मळून पडले, वीजखांब कोसळल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. यात जेवरा (Jevra) गावात जवळपास ७५ घरांचे तर लोणी येथे जवळपास २५ ते ३० घरांचे नुकसान झाल्याची तर २ नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote) यांनी या परिसरात दौरा करून जेवरा, लोणी परिसरातील नागरिकांच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांचे सांत्वन केले तसेच घटनेची माहिती मिळताच आपण स्वतः तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून  नुकसानग्रस्तांना भरीव शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली असल्याची माहिती आ. धोटे यांनी ग्रामस्थांना दिली. (Instructions to the administration to provide immediate assistance to the victims) 

      यावेळी कोरपना काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, ज्येष्ठ नेते सुरेशराव मालेकर, माजी संचालक भाऊराव चव्हाण, जेवरा येथील रसूल पाटील, अनिल गोंडे, सुधाकर भोयर, विठोबा गेडाम, लोणी येथील घनश्याम नांदेकर, ज्ञानेश्वर आवारी, देवराव सोनटक्के, मुसळे जी, डॉ. पिंपळशेंडे, सिद्धार्थ सातपुते, गजानन काकडे यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (mahawani) (rajura) (mla subhash dhote)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top