बल्लारपूर तालुक्यातील जुन्याच कार्यकर्त्यांना परत पक्ष प्रवेश : पक्ष प्रवेशात बल्लापूरातील सक्रिय नेते उपस्थित नाही.
२१ मे २०२४
बल्लारपूर : काल २० मे रोजी बल्लारपूर शासकीय विश्रामगृहात आम आदमी पक्षात अनेकांनी पक्षप्रवेश केला ह्या वेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. मयूर राईकवार, विधी सल्लागार ऍड. किशोर पुसलवार, जिल्हा समिती सदस्य परमजीत सिंग झगडे, बलराम केसकर आणि विशाल माने इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. (Mayur Raikwar)
आम आदमी पक्षाचे पदाधिकारी, कर्तृत्ववान कार्यकर्ते, जेष्ठ नेते, ज्यांनी बल्लारपूर क्षेत्रात पक्षवाढी करीता आपल्या जीवाचे रान केले, रक्ताचे पाणी केले, एवढेच नाही तर मा. पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांच्या सुटके साठी आपल्या रक्तने पत्र लिहून प्रशासनाचे लक्ष वेधणारे बल्लारपूर येथील पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शहरअध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, श्री. सुरज ठाकरे व कार्यकर्ते तालुका स्तरावर उपस्थित असतांना मा. जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या एकेरी मार्गाचे दर्शन देत सदर पक्षातीलच कार्यकर्त्यांचा पुन्हा पक्ष प्रवेश करून घेतला असल्याचा पक्षातील जेष्ठ व पक्षाच्या उदयापासून पक्षाची कास पकडून असणारे नेते, पदाधिकारी बोलत आहे.
बल्लारपूर येथील धुरा रवीकुमार पुप्पलवार (Ravikumar Puppalwar) यांच्या कडे असून ती त्यांनी पक्षा सोबत जुडल्या पासून अत्यंत मेहनतीने व इमाने इतबारे पार पडली आहे. बल्लारपूर शहरातील, जिल्ह्यातील समस्ये करीता, नागरिकांच्या हिताकरिता वेळो वेळी धावून जात चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाची पक्ष बांधणी करीता त्यांचे मौलाचे योगदान आहे हे विसरण्या जोगी बाब नाही.
याच प्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे (Suraj Thakre) यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात आम आदमी पक्षाचा एकेरी झेंडा रोवला असून त्यांची लोकप्रियता, सामाजिक कार्य प्रणाली, कामगर संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे, गोर गरीब नागरिकांच्या समस्ये करीता प्रत्येक शनी ढाल बनून समोर उभे राहत जनतेचे प्रश्न मार्गी नलागल्यास आमरण उपोषण करून अवघ्या ४ तासात नागरिकांचे प्रश्न सोडवणारे एकमेव नेते म्हणून नाम ख्याती मिळवली आहे. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात आम आदमी पक्ष वाढी करीता तन, मन, धनाने कार्य करून खेड्या - पाड्यात आम आदमी पक्षाचे काम पोहचवले आहे.
या करिता आम आदमी पक्षाचे अनेक निष्ठावान नेत्यांना सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमात निमंत्रित नकेल्याने दुफळी निर्माण करण्याचे काम जिल्हाध्यक्ष करीत आहे कि काय ? असे सवाल आम आदमी पक्षातील काही नेत्यांनी विचारले आहे. जिल्हाध्यक्ष श्री. मयूर राईकवार यांनी कालचा पक्ष प्रवेशात संबंधित व आपल्या फडीतील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना सोबत न घेऊन एकेरी वाट पथकारली आहे कि काय ? असे हि सवाल वरिष्ठानंकडे पधाधिकाऱ्यानी केले आहे. (mahawani) (aap) (chandrapur)
- अनुभव अभावी जिल्हाध्यक्ष या चुका करीत आहे. जिल्हाध्यक्ष त्यांच्या पदाला न्याय देत नसल्याचे त्यांच्या वागणुकीतून दिसून येत आहे. भविष्यात जिल्हाध्यक्ष अशा चुका दोवरावणार नाही व निश्चितच ते चुकत सुधारणा करील असा विश्वास बाळगून आम्ही पक्ष वाढी करीता व पक्षा करीता सोबत आहे. पक्ष प्रवेश केला त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. - श्री. सुरज ठाकरे, आप, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष
- मला सदर पक्ष प्रवेश संधार्बत कुठलीच माहिती नाही. मी पक्षाच्या प्रचारा करीता दिल्ली येथे असल्याने मला जिल्हाध्यक्ष किव्हा इतर पदाधिकाऱ्यांकडून सदर पक्ष प्रवेश बाबत माहिती / सूचना मिळालेली नाही. -श्री. रवीकुमार पुप्पलवार, बल्लारपूर शहर अध्यक्ष
- पक्षातील स्थानिक मतभेद असावे किव्हा निवळणुकीच्या धामधुमीत सदर पक्ष प्रवेश झला असावा सदर पक्ष प्रवेशा संदर्भात संपूर्ण अहवाल मागविला असून येत्या ५ जूनला जिल्हास्तरीय बैठक आयोजित करून न्याय देऊ - डॉ. शाहिद जाफरी, आप, सचिव महाराष्ट्र राज्य