आरोपी समेत ९५,०७६ मुद्देमाल जप्त.
०६ मे २०२४
चंद्रपूर / घुघुस : मा. श्री. मुमाक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सांभाळतच संपूर्ण जिल्हयात स्थानिक गुन्हे शाखे समेत इतर शाखेतुन विशिष्ट पथके तयार करून जिल्हातील गुन्हेगारी, अवैध मद्य विक्री, शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाकू इत्यादी अवैध व्यावसायिकांचे मुसके आवरले आहे. यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध व्यवसायिकांवर कारवाईचा धडाकाच लावला असून पथकात मा. श्री. महेश कोंडावार (Hon. Mr. Mahesh Kondawar) सारखे धाडसी व कार्यदक्ष पोलीस निरीक्षक नियुक्त केल्याने अवैध व्यावसायिकांची जिल्ह्यात चांगलीच कोंडी झाल्याची पाहायला मिळत आहे. याच प्रमाणे काल ०५ मे रोजी खात्रीशीर गोपनीय माहिती नुसार घुघुश पोलीस स्टेशन क्षेत्रात मोठ्याप्रमाणात सुगंधीत तंबाकूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने घुघुस येथे (Hon. Mr. Mumakka Sudarshan) आरोपीच्या घरातून.
२४० पाउच गरुड शिसा हुक्का तंबाखू प्रति २०० ग्रॅम प्रत्येकी ७४,४००/- रुपयाचे, २९ पाउच होला हुक्का शिशा तंबाखू प्रति २०० ग्रॅम प्रत्येकी ४,७५६/- रुपयाचे, ३५ पॉकेट राजश्री पान मसाला गुटका प्रत्येकी १८० ग्रॅम... किमतीचे ९,४५०/-, ०३ पॉकेट विमल पान मसाला गुटका प्रति ८४ ग्रॅम प्रत्येकी ३६०/-, 2,760/-₹ किमतीचा ९२ पॉकेट V-1 तंबाखू., २९ पॉकेट ब्लॅक लेबेल १८ प्रीमियम च्युइंग तंबाकू प्रति ३० ग्रॅम प्रत्येक 870/- रुपये, २० पॉकेट एनी स्वीट सुपारी १२००/-, ०४ पॉकेट सिग्नेचर पान मसाला गुटका प्रति १४४ ग्रॅम १,२८०/- एकूण ९५,०७६/- किमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १८८/२०२४ से. ३२८, १८८, २७३, २७२ आयपीसी. R/w ३०(२),२६(२)(a), ३, ४, ५९(१) अन्न आणि औषध कायदा २०००६. नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी एक आरोपी आणि मालमत्ता घुग्गुस पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. ( mahawani ) (ghughus) (maha Police) ( tobacco smuggling )