निरंतर लोड शेडींगने व विद्युत खंडनाने रामपूर वासी त्रस्त.

Mahawani


येत्या १० दिवसात मागण्या मान्य नकेल्यास बेमुद्दत आंदोलन करण्याचा इशारा.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२८ मे २०२४

राजुरा/रामपूर : मागील काही काळापासून रामपूर क्षेत्रात विद्युत पुरवठ्या संधर्भात मोठ्या समस्या निर्मण झाल्या आहे. रामपूर क्षेत्रात व्यावसायिक, घरे बांधकाम व लोकसंख्येत वाढ झाल्याने विद्युत प्रवाहाची मागणी वाढली आहे. या संधर्भात स्थानकातून महावितरण विभागाला वारंवार कळवून देखील संबंधित विभागा मार्फत आज परियंत कुठलीही उपाययोजना केले गेलेली नाही. रामपूर क्षेत्रात विद्युत प्रवाहाची मागणी वाढल्याने क्षेत्रातील महावितरण विभागाने पूर्वी काळी लावलेल्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर DP) वारंवार निष्क्रिय होत असल्याने स्थानिकांना निरंतर विद्युत अभावी भर उन्हाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

        स्थानिक व्यवसायिकांनकडून वारंवार सदर समस्ये बाबत महावितरण विभाग, राजूराला तक्रारी देऊनहि कुठलीहि उपाययोजना न करता विभागाकडून उडवा उडवीचे उत्तर आल्याने काल २७ मे रोजी महावितरण कार्यालय, राजूराला स्थानिक व्यावसायिक व रामपूर ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढत सदर क्षेत्रात २०० के. वि (२०० KVA) रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लावण्याची निवेदनात्मक मागणी केली आहे. व सदर मागणी येत्या १० दिवसाच्या आत पूर्ण न केल्यास महावितरण कार्यालय, राजुरा समोर बेमुद्दत आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.

        या वेळी सचिन क्षरिसंगर, अंकित कुडे, अरविंद वांढरे, भूषण वीरूटकर, भारत खेडेकर, विशाल इतंकर, विनोद पिदूरकर, मंडल वांढरे, अमर बोढे, दीपक जानवे, चेतन रोगे, सचिन नागरडे, सौ. सुमन कुठे, सौ. सुनीता इतंकर, सौ. ललिता बघेल, सौ. गीता लांडे, सौ. मंजुषा दुपारे व रामपूर ग्रामस्थ उपस्थित होते. (mahawani) (rajura) (mahavitaran) (rampur)

  • अति तापमानाने सदर क्षेत्रातील रोहित्रात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यात आम्ही कालच सुधारणा केली आहे. तसेच २०० KVA रोहित्र मागणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार आहे. -श्रीनिवास बडगु, उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग, राजुरा   

To Top