चंद्रपूर पोलिस अधिक्षकांना शिवसेनेचे निवेदन.
२७ मे २०२४
चंद्रपुर : पुण्यात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन वाहन चालकाने बेजबाबदारपणे चारचाकी वाहन भरधाव वेगाने चालवून दोन निरपराध नागरिकांचा बळी घेतला. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातही अल्पवयीन दुचाकी तथा चारचाकी वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे भविष्यात येथे कोणती ही अनूचित घटना घडू नये, यासाठी त्वरीत दखल घेऊन जिल्ह्यात एक विषेश मोहिम राबवून अल्पवयीन वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी व जिल्ह्यातील दारु तथा बारमालकांना अल्पवयीन युवकांना दारु विक्री न करण्याची सुचना द्यावी, सदर विषयासंदर्भात शिवसेना जिल्हा संघटक ऍड. युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
अल्पवयीन वाहनचालकांकडून जिल्ह्यात बेजबाबदारपणे दुचाकी व चारचाकी वाहने चालविण्याने याआधी अनेक अपघात घडले आहे. अशा अपघातांमध्ये अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याची उदाहरणे आहेत. अशा बेलगाम वाहन धारकांमुळे पादचारी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच याशिवाय बार व मद्य दुकान मालकांकडून अल्पवयीन युवकांना मद्य विक्री केल्या जात असल्याचे प्रकार देखील आढळून येत आहे. या प्रकारावर त्वरित आळा घालून अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाईची मोहीम सुरु करावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. (Take immediate action against minor drivers)
सदर गंभीर विषयाची तात्काळ दखल न घेतल्यास शिवसेनेतर्फे जिल्ह्यात सर्वत्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी निवेदन सादर करतांना शिवसेना जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर, जिल्हा प्रमुख बंडू हजारे, विधानसभा संघटक नरेश काळे, शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी (santosh parkhi), वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान आदी उपस्थित होते. (mahawani) (chandrapur) (spchandrapur) (Traffic Police)