भिंती कोसळून वाहनाचे मोठे नुकसान : इतर कॉटेर्सच्या भिंतीही धोका दायक.
राजुरा/गोवरी कॉलोनी : १० मे रोजी रात्रो ०२:०० च्या सुमारास गोवरी कॉलोनी येथील ब्लोक क्रमांक.०२, कॉटेर्स क्रमांक. १२ च्या भिंती कोसळून कॉटेर्स खाली उभी असलेली श्री. विनोद नागापुरे (vinod nagapure) यांच्या मालकीची दुचाकी क्र. MH - 34 - BC 7872 वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सदर दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून भविष्यात कॉटेर्सची अवस्था पाहता जीवित हानी होणे नाकारता येत नाही. कॉटेर्सची अवस्था पाहता जीवित हानी केव्हा साधनाचे मोठे नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण असे प्रश्न नागापुरे समेत कॉटेर्स धारक विचारात आहे.
सदर कॉटेर्स हे वे.को.ली बल्लारपूर शेत्रातील गोवरी कॉलोनी येथील असून सदर कॉलोनी मध्ये पुराणी व नवीन कॉलोनी असे दोन भाग आहे. नवीन कॉलोनी हे काही वर्षा अगोदर तयार होऊन वे.को.ली. कर्मचार्यांना वास्तव्य करण्या करिता प्रदान करण्यात आली आहे. तसेच पुराणी (जुनी) कॉलोनी देखील याच प्रमाणे वे.को.ली. कर्मचाऱ्यांना वास्तव्याला दिली गेले आहे. (Walls of cotters in Gowri Colony collapsed due to wcl carelessness)
परंतु पुराणी (जूनी) कॉलोनी खूप वर्षापासून कर्मचाऱ्यांना वास्तव्या करिता दिली गेली असून त्याचे बंधकाम कच्चे झाल्याचे पाहायला मिळत आहे. वे .को. ली च्या सिव्हिल विभागा मार्फत सदर कॉटेर्सची देखरेख तथा पाहणी केली जाते परंतु सदर कॉटेर्सची कुठलीहि देख रेख संबंधित विभाग मार्फत केली जात नसून सदर समस्या घेऊन कित्तेकदा माहिती व तक्रारी केल्या परंतु अजून पर्यंत कॉटेर्स दुरुस्ती संधर्भात वे.को.ली (W.C.L.) कडून कुठलेही ठोस पाउल उचलले गेले नाही. वे.को.ली सिविल विभाग सदर गंभीर समस्ये कडे काना डोळा करून स्थानिकांचा जीव धोक्यात घालण्याचे काम करत असल्याचे स्थानिकातून बोलले जात आहे. (mahawani) (rajura) (sasti) (gowari Colony)