सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
०१ जून २०२४
बल्लारपूर : काल ३१ मे रोजी आम आदमी पक्षातर्फे (aap) शासकिय गेस्ट हाऊस मध्ये महिला राजकिय सशक्तीकरण सभा आयोजित करण्यात आली. सदर सभा आयोजित करण्यात शहर महिला अध्यक्षा किरण खन्ना व उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला. या सभेत जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार व सुरजभाऊ ठाकरे (suraj thakre) यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकिय क्षेत्रात महिलांचा सहभाग, सध्या स्थितीत महिलांचे राजकिय सहभाग याविषयावर शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार (ravikumar puppalwar) यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. (Women's Political Empowerment Meeting concluded)
यावेळेस कार्यक्रमाचे संचालन शहर संघठन मंत्री रोहित जंगमवार एव महिला सचिव शितल झाडे यांनी केले व बल्लारपूर शहरातील सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (mahawani) (ballarpur) (aap)