सुरज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक कुठल्या पक्षा कडून लढणार ? #Rajura-Assembly-Constituency

Mahawani


वरिष्ठ नेत्याने ५०/५० फॉर्मुल्यावर सुरज ठाकरे यांचा प्रवेश करून घेतला 


महावाणि - विरेंद्र पुणेकर
१२ जून २०२४

राजुरा : आगामी विधानसभा निवडणुकीची चूलबुल सर्वत्र महाराष्ट्रात सुरु झाली असून मोठमोठे नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. काही नेते पक्षाची मनधरणी करण्यात गुंतले आहे. तर काही कार्यकर्त्या सोबत आपल्या क्षेत्रातील कामे करून विधानसभा क्षेत्रात आपली ताकद सिद्द करत आहे. काही नेते अजूनही पक्षाचा भूमिकेवर नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. 

आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून येत आहे. पक्षांनी आपल्या नेत्यांशी गाठी भेटी वाढवून समोरील योजना आखण्याचे काम मोठ्या जोमाने सुरु केले आहे. तर काही पक्षांनी अद्याप आपल्या नेत्यांचे चेहरे समोर आणलेले नाही. याने काही पक्षात पक्षपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही नेते जे इतर पक्षातून पक्षाशी जुडले त्यांना जुडताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नकेल्याचे समोर येत आहे. काही नेत्यांना पक्षा कडून पक्ष कामा करीता रसद पुरवली जात नसल्याने नेते बोलताना दिसत आहे. 

सुरज ठाकरे विद्यमान जिल्हाउपाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर ( aam aadmi party, chandrapur ) यांनी आपल्या राजकीय प्रवास मणसे मधून सुरु केला. काही कालांतराने त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षात काही वर्ष काम केले. सदर दोन्ही पक्षाची सात सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला त्यांना त्यांची कारकीर्द व दांडगा जनसंपर्क पाहून जिल्हा उपाध्यक्ष पदहि बहाल करण्यात आले. पक्ष प्रवेश करत असताना त्यांनी आगामी राजुरा विधानसभा निवडून लढण्याची इच्छा दर्शवली होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुरज ठाकरे ( suraj thakre ) यांनी विद्यमान पक्षाचे काम एक निष्ठेने केले. परंतु जनसंपर्क वाढविण्या करीता नागरिकांचे प्रश्न सोडवत त्यांचा मनात पक्षाचे कार्य रुजवण्या करीता आर्थिक भांडवलाची अत्यंत आवशकता असते परंतु पक्षाचे निष्ठेने काम करून देखील पक्षा सोबत जुडल्या पासून कुठली हि रसद पुरवल्या गेली नाही. आज परियंत पक्षाचे काम मी स्वतःच्या खर्चातून केले. असे हि त्यांनी सांगितले आहे. ( Rajura Assembly Constituency )

राजुरा विधानसभा क्षेत्राला नवा तरुण चेहरा हवा असे मत जनसामान्यांमध्ये आहे. नेहमीचे चेहरे आणि न होणारी कामे यातून जनता कंटाळली आहे. येत्या काही दिवसात सुरज ठाकरे विद्यमान पक्षशात कार्य करताना पाहायला मिळणार कि नाही. हि चर्चेची बाब आहे. सुरज ठाकरे यांचे निकटवर्तीय व चांगले मित्र भारत राष्ट्र समितीचे नेते मा. आत्राम साहेबांसोबत गुप्त भेटी-गाठी सुरु असल्याने सुरज ठाकरे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सुरज ठाकरे भारत राष्ट्र समिती ( BRS ) पक्षाच्या संपर्कात आधी पासूनच आहेत आणि मनसे हा त्यांचा मूळ पक्ष असल्याने त्यांचे स्वागतच करेल. सुरज ठाकरे एक कामगार नेते असून त्यांची जय भवानी कामगार नावाची संघटना  ( jay bhawani kamgar sanghatna, chandrapur ) असून ते कामगारांचे प्रश्न सोडवण्या करीता सदर संघटनेच्या माध्यमातून अविरत काम करीत आहे. आम आदमी पक्षा सोबत जुडल्या पासून त्यांनी पक्ष व संघटना या  दोन्ही नावाचा उपयोग करून काम केले. परंतु काही दिवसा पासून त्यांनी एकेरी जय भवानी कामगार संघटना हेच नाव समोर केले आहे. 

स्वतःचा चाहता वर्ग निर्माण करण्यात मोठ्या प्रमाणावर सुरज ठाकरे यांना यश प्राप्त झाले आहे. त्या मुळे पक्षाला अश्या नेत्यांची गरज आहेच परंतु आम आदमी पक्षात प्रवेश घेण्याची सध्यातरी गरज नव्हती असे विचार त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांचे होते. पक्षातील वरिष्ठ नेत्याने ५०/५० फॉर्मुल्यावर होकार दर्शवत सुरज ठाकरे यांचा प्रवेश करून घेतला पण एकटे सुरज ठाकरे वगळता चंद्रपूर मध्ये आम आदमी पक्ष हा आमच राहिला आहे. यात काही शंका नाहीं. वजनदार नेत्याचा फायदा पक्षाला घेता आला नाही हे तेवढेच खरे आहे. असे सुरज ठाकरे यांच्या समर्थकांतून बोलले जात आहे. 

सातत्याने पक्ष बदलल्याने नेत्याची छबी मलिन होते यात काही शंका नाहीं. परंतु पक्षातील नेते खोटी आश्वासने देऊन पक्ष प्रवेश करून घेत असतील तर त्यात नेत्यांची फसवणूक होते. असे काही सुरज ठाकरे यांच्या सोबत झाल्याचे त्यांचे समर्थक बोलू लागले आहेत. भाऊंनी आगामी विधानसभा निवडणूक अपक्षच लढावी असे खाजगीत बोलल्या जात आहे. ( mahawani ) (rajura) ( chandrapur ) ( Assembly Election 2024 )

To Top