आ. सुभाष धोटेंनी केली गोवरी पुल बांधकामाची पाहणी.

Mahawani


२५ जून काम पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१९ जून २०२४

राजुरा : राजुरा- माथरा - गोवरी - पोवनी या राज्य मार्गावरील गोवरी गावाजवळ असलेल्या पुलाचे रखडलेले बांधकाम कोणत्याही परिस्थितीत लवकर पूर्ण होऊन हा रस्ता स्थानिक नागरिकांच्या रहदारीसाठी सुरू व्हायला हवा यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून तसेच जवळपास तिनदा प्रत्यक्ष भेट देऊन निर्माण कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला, काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे येथे पुल निर्माण कार्याला गती येऊन आता निसर्गाने सात दिल्यास २५ जून पर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन रस्ता रहदारीसाठी सुरू होणार आहे. आ. सुभाष धोटे यांनी आज पून्हा गोवरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन या निर्माण कार्याची पाहणी केली. गोवरी आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना या पुला अभावी बराच त्रास सहन करावा लागत आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत तसेच शेती व अन्य कामांसाठी नागरिकांना ये जा करण्यासाठी हा रस्ता सुरू होणे आवश्यक आहे त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत २५ जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. 

        या प्रसंगी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंते, पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे अभियंते,  शिवराम लांडे, गजानन उरकुडे, विठ्ठल पाचभाई, अशोक पिंपळकर, प्रभाकर जुनघरी, विकास पिंपळकर, रामदास पाचभाई, नीलकंठ पोथले, प्रकाश काळे, चेतन बोभाटे, सोनटक्के यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ( Mahawani ) ( Rajura ) ( gowari )



To Top