आम आदमी पार्टी बल्लारपूर यांची मुख्याधिकारी यांना निवेदनात्मक मांग
२० जून २०२४
बल्लारपूर : शहरात मुसळधार पावसाची स्थिती असतांना देखील शहरातील अनेक छोट्या मोठ्या नाल्यांची अजून सफाई झालेली नाही. जोमाने पावसाला सुरुवात झाल्यास नाल्यांची घाण नागरिकांच्या घरात शिरकावू शकते तसेच हि घाण ये जा करण्याच्या मार्गावर देखील साचू शकते या अगोदरही शहरात घाण साफ न केल्याने सर्व घाण पावसाच्या पाण्याने सर्वत्र पसरली होती याने नागरिकांना घाणीचा अत्यंत त्रास सहन करावा लागला होता ज्यात नागरिकांच्या स्वास्थाला धोका निर्माण झाला होता.
करीता सदर परिस्थिती लक्षात घेता आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार ( Ravi Bhau Puppalwar ) यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने मुसळधार पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच नालेसफाई चे काम पूर्ण करण्याची मांग घेऊन नगर परिषद, बल्लारपूर चे उपमुख्याधिकारी जयवंत काटकर ( Deputy Chief Jaywant Katkar ) यांना १९ जून रोजी निवेदन देण्यात आलेले आहे.
तसेच ५ ते ६ दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने शहरातील अनेक झाडे कोसळली आहे. त्यामुळे आता पावसाची जोमाने सुरूवात होण्यापूर्वी रस्त्यालगत असलेली धोकादायक झाडे जी पावसात कोसळू शकतात व दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतात अश्या झाडांची छाटणी चे काम तात्काळ पूर्ण यावे अशी देखील विनंती आप शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.
यावेळेस शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, गणेश अकोले यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ( MAHAWANI ) ( aap ) ( Municipal Council, Ballarpur )