सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्धी पूर्वीच अंतिम शिफारस व निवड यादी प्रसिध्द.

Mahawani

 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट- क परीक्षा निकालात मोठा गोंधळ ?

 

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१९ जून २०२४

महाराष्ट्र : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट- क संवर्ग, सरळसेवा भरती २०२३ परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत गट- क मधील पुरवठा नरीक्षक सर्वगातील एकूण ३२४ पदांच्या भरतीकरीता २६, २७ व २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षा कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागाकरिता घेण्यात आली होती. परीक्षेकरीता हजाराच्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले होते. 

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत गट- क मधील पुरवठा नरीक्षक सर्वगातील ३२४ पदांच्या निकाल जाहिरात क्रमांक : प्र.क्र.६३/२०२२ नुसार २० जून २०२४ पर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार होता. जो १८ जून २०२४ रोजीच प्रसिद्ध करण्यात आला व त्याच बरोबर अंतिम शिफारस यादी देखील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात अली आहे.

परंतु जाहिरात क्रमांक : प्र.क्र.६३/२०२२ मधील अनुक्रमांक ०९ नुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. ९.१ पुरवठा निरीक्षक पदाच्या अंतिम शिफारशीपूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी ( General Merit List ) विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. व ९.२ त्यानंतर गुणवत्ताप्राप्त उमेदवारांची अंतिम निवड यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. असे निर्देश दिले असून विभागाच्या संकेतस्थळावर कुठलीही सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्या आधीच अंतिम निवड यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असल्याने विध्यार्थ्यांच्या हाताचे केस उभे झाले आहे. 

अंतिम शिफारशीपूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द न होता अंतिम निवड यादी प्रसिध्द करत उमेदवारांना विभाग देण्यात आल्याने विध्यार्त्यातून परीक्षा निकालावर प्रश्न उभे केले जात आहे. उद्या निवड झालेले उमेदवारांना विभाग/कार्यालयीन कार्यभार देण्यात येणार आहे. निवड झालेले उमेदवारांचा कार्यभार थांबवून सदर निकालावर सखोल चौकशी करण्याची मांग विध्यार्त्यातून होत आहे. ( By stopping the work of selected candidates )

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट- क संवर्ग, सरळसेवा भरती २०२३ परीक्षा निकालात काही विध्यार्थ्यांना १७४, १७२ गुण पडलेले आहे. परंतु सदर विद्यार्थ्याला मागील कृषी सेवक परीक्षेत २०० पैकी ७० आणि तलाठी परीक्षेत २०० पैकी ७४ गुण पडले होते आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट- क संवर्ग, सरळसेवा भरती २०२३ परीक्षे मध्ये १७४, १७२ गुण पडल्याने विद्यार्थ्यातून सदर निकालात मोठा गोंधळ झाल्याचे बोलले जात आहे. 

तसेच अन्न नागरी पुरवठा विभागा पुरवठा निरीक्षक पदातून निरीक्षणाधिकारी पदावर पदोन्नती घेण्याकरता सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घेऊन एक वर्ष होत असून २०३ पद पैकी फक्त ०२ पधाधिकार्यांना पदोन्नती देण्यात आली व उर्वरित २०१ पुरवठा निरीक्षकांना गाजर दाखवण्यात आले आहे. व अद्याप त्यांना निरीक्षण अधिकारी पदाचे आदेश न देता पुरवठा निरीक्षक संवर्गाच्या निकाल लावून कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचे काम शासन करीत आहे. ( mahawani ) ( mahafood ) ( Konkan, Pune, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Amravati and Nagpur )

( https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx )

To Top