तपासा करीता बोलावले आणि अर्धा तास पट्ट्याने सूज येई पर्यंत बेदम हाणले. #korpana #chandrapur

Mahawani


कोरपना ठाणेदाराचा प्रताप ; पोलीस अधीक्षकाकडे तक्रार


महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ जून २०२४

कोरपना : मागील गुन्ह्या संदर्भात पोलीस चौकीत बोलवून ठाणेदारानी अश्लील शिवीगाळ करत पट्ट्या-पट्ट्याने बेदम मारहान केल्याप्रकरणीची तक्रार पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांना ८ जून रोजी करण्यात आली आहे.

        दिलेल्या तक्रारीत, शुक्रवार दिनांक ७ जून रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता कोरपना पोलीस चौकीचे ठाणेदार, एक वाहतूक पोलीस कर्मचारी, एक महिला पोलीस कर्मचारी यांना घेऊन तांडा ( धानोली ) येथे आले. येथील रमेश सिंगटराव मूनावत ( Ramesh Singtrao Moonawat ) यांचे घरी अवैध दारूसाठा असल्याच्या संशयावरून घराची झडती घेतली. त्या शनी रमेश मुनवात यांची लहान मुलगी घरात उपस्थित होती त्या दरम्यान रमेश मुनावत यांचे पुतणे ( तक्रारदार ) विपुल देविदास मुणावत यांनी घरात कुणीही नाही असे सांगितले यावर ठानेदारानी शासकीय कामात अडथळा आणू नको असे बजावले. 

        रमेश मुनावत यांचे घर तपासल्यानंतर विपुल मुणावत चे घर कुठे आहे विचारले व विपुलच्या घराचा तपास केला तपासात काहीच आढळून आले नाही. तेव्हा ठाणेदार यांनी मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे तर ( तक्रारदाराला ) ८ जून राजी पोलीस ठाण्यात बोलवले. ठाण्याच्या आवारात पोहचताच विपुल मुनावत ( vipul munawat )यांनी आपल्या मोबाईल मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग ( Audio recording ) सुरू केली व ठाणेदाराने बोलावल्या प्रमाणे ठाण्यात गेला ठाण्यात पोहचताच ठाणेदारानी विपुलला केबिनमध्ये बोलवले व केबिनमध्ये पोहचताच विपुलला अश्लिल शिवीगाळ करत शिपायाकडून पट्टा बोलवून पन्नास पट्टे मारण्यास सांगितले.

      विपुलला अर्धा तास पट्ट्यांनी सूज येई पर्यंत चोप दिल्यानंतर ठाणेदारांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आई, बहिणी विषयी अश्लील शिवीगाळ केली व दवाखान्यात गेल्यास तर पुन्हा चोप देईल अशी धमकी देऊन गावाला परत पाठविले. गावकऱ्यांनी विपुलची अवस्था पाहता विपुलाला दवाखान्यात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून उपचार केले. 

       झालेल्या प्रकरणाची चौकशी करून ठाणेदार व पोलीस शिपायास कारवाई करून तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी अन्यायग्रस्त व तक्रारदार विपुल मुनावत यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. ( korpana Police ) (mh police) ( chandrapur ) 

  • आरोपीवर काही महिन्या अगोदर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्या संबंधित माहिती विचारण्याकरिता त्याला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होते. मात्र आरोपीने जो आरोप केला त्यात कसलेही तथ्य नाही. - संदीप एकाडे, ठाणेदार, कोरपणा पोलीस स्टेशन

  • सदर प्रकरणावर आम्ही कारवाई केली आहे. सदर विषयाचा तपास करून योग्य तो न्याय देऊ - मा. श्री. मुंमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर  

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top