वेकोलि कडून लेखी पत्र घेत उपोषण मागे.
२८ जून २०२४
राजुरा : वेकोली बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सास्ती व गोवरी विस्तारित खाणीकरिता अधिग्रहीत केलेल्या जमिनीच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी सामावून न घेता केवळ शेतीचा मोबदला देऊन बोळवण केली; असा आरोप करून प्रकल्पग्रस्तांनी काम बंद करण्याबरोबरच आपल्या सहा प्रमुख मागण्यांसाठी बुधवार २६ जून पासून खाण परिसरात साखळी उपोषण सुरू केले होते. सदर उपोषणकर्त्यांना देवराव भोंगळे ( deorav bhogle ) यांनी भेट देऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह उपस्थित वेकोलिच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली होती; त्या अनुषंगाने, काल २७ जून वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे महाप्रबंधक इलियास हुसेन ( Elias Hussain ) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. यादरम्यान उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून यासंदर्भात झालेल्या चूका मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन महाप्रबंधकांनी दिल्याने उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्तांशी मध्यस्थी करून वेकोलि कडून प्राप्त लेखी पत्र देत उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी, तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, माथऱ्याचे सरपंच हरिदास झाडे, मधुकर नरड, सुभाष रामगीरवार, पुरूषोत्तम लांडे, संजय उपगण्लावार, अजय राठोड, दिपक झाडे, कवडू खोखले, अनिल डाखरे, संतोष चहारे, शंकर बोढे, प्रफुल मशाऱ्हकर, अतुल सहारे, सचिन झाडे, शंकर दरेकर, शंकर लांडे, दिलीप वैद्य, रमेश कुडे, सचिन भोयर, स्वप्नील पहानपटे, प्रविण खेडेकर, अशोक खोबरे, शरद लांडे, यांचेसह वेकोलिचे ए.पी.एम. रामानुजम, एरिया प्लॅनिंग मॅनेजर चक्रवर्ती, राजेंद्र ठाकरे, श्री. गोपाल, शैलेश माटे यांची उपस्थिती होती. ( mahawani ) ( wcl ) ( bjp ) ( rajura )