वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा ! #devrao-bhongle #bjp #mahavitaran

Mahawani


विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन ! 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२० जून २०२४

राजुरा : विज वितरणामध्ये आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या चंद्रपुर जिल्ह्यातून महाराष्ट्रासह इतर राज्यातही विज पुरवठा केला जातो; परंतू राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात वारंवार विनाकारण विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये विज वितरण विभागाच्या कार्यप्रणालीबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे खंडीत होणारा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवण्यासाठी महावितरणने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपाचे राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे ( Devrao Bhongle ) यांनी १९ जून रोजी महावितरणच्या अधिक्षक अभियंता श्रीमती. चिवंडे ( Superintending Engineer Smt. chiwande  ) यांना भेटून दिलेल्या निवेदनातून केली आहे.

देवराव भोंगळे यांनी शिष्टमंडळासह चंद्रपुर येथील महावितरण कार्यालयात जाऊन सदर निवेदन देतेवेळी त्यांच्यासमवेत गडचांदूरचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, नगरसेवक अरविंद डोहे व अशोक झाडे उपस्थित होते. सद्यस्थितीत पाऊस नियमित नसल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे, अशात विज पुरवठा नियमित असण्याची नितांत आवश्यकता आहे. गर्मीमुळे लहान बालके, वयोवृद्ध नागरीक विजेच्या सारख्या लपंडावाने हैराण झाले आहेत. पाऊस किंवा वादळसदृश परिस्थिती नसतांनाही या भागात नेहमीच विनाकारण विज पुरवठा खंडित केला जातो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन महावितरणने योग्य उपाययोजना कराव्यात, यासोबतच राजुरा शहरात तर विजेच्या लपंडावाची मोठी समस्या आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याने नागरीकांमध्ये मोठा क्षोभ निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याकडेही विशेष लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात याठिकाणी चर्चा करण्यात आली. 

विद्युत पुरवठा नियमित सुरू नकेल्यास लोकांच्या भावना लक्षात घेत आपल्या विभागाविरूद्ध मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांनी यावेळी महावितरणला दिला. ( mahawani ) ( rajura ) ( bjp ) ( chandrapur ) ( mahavitaran )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top