भरधाव वेगाने येत असलेल्या अवजड ट्रकने दुचाकी चालकाला दिली धडक उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू.
राजुरा/सास्ती : आज सकाळी ११ वा. च्या सुमारास सास्ती-राजुरा मार्गावर जे. के. ट्रान्स्पोटचे ( J. K. Transport ) अवजड वाहन क्रमांक. MH 34 AV 2559 ने सचिन पिपरे (२८) रा. बोर्डा ( SACHIN PIPARE ) याच्या दुचाकी वाहनाला धडक दिली. वाहन चालक घटनस्थळावरून पसार झाला असून सचिनच्या डोक्याला जब्बर दुखापत झाली आहे.
डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने घटनास्थळावरून नागरिकांनी वेकोलि रुग्णवाहिकेचा सहाय्याने सचिनला प्राथमिक उपचाराकरिता वेकोलि चिकित्सालय, धोपटाला येथे दाखल केले. डोक्याला जब्बर धुखपत असल्याने वेकोलि चिकित्सालयातून सचिनला उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे हलवण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे सचिनची गंभीर परिस्तिथी पाहता जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे हलवण्यात आले. जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे हि सचिनची गंभीरता पाहता अतितातडीने उपचारा करीता नागपूर येथे रुग्णवाहिकेने हलवण्यात आले परंतु मार्गातच भद्रावती जवळ सचिनने अखेरचा स्वास घेतला.
सचिनच्या मृत्यूने सचिनच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सचिन हा घरचा कमावता व्यक्ती असल्याने परिवारावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सचिन पश्चात त्याची पत्नी, ७ वर्षाची मुलगी, लहान भाऊ, आई वडील असा परिवार आहे.
अपघाता वेळी ट्रक अतिभार कोळस्याने भरला होता. परंतु सदर वाहन कारवाई करीता तहसील कार्यालय, राजुरा येथे आणण्यात आले तेव्हा सदर वाहन खाली अवस्थेत आढळून आल्याने नागरीकातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वेकोलि बल्लारपूर उपक्षेत्र सास्ती भागातून अवजड वाहन कोळसा भरून राजूराच्या दिशेने सुरक्षा ताडपत्री विना अतिभर कोळसा भरून भरधाव वेगाने धावतात. बहुतांश वेळी अतिभर कोळसा भरलेल्या ट्रकचे तात्काळ ब्रेक लागणे शक्य होत नाही. असे वाहन चालक सांगतात.
- जितेंद्र बालोदा, मालक, जे. के ट्रान्सपोर्ट, रामपूर यांनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून १,०००००/- देण्याचे मान्य केला आहे.